Bicycle rally has been organized by the Cyclist Association for the awareness of 'Swachh Bharat, Harit Bharat' esakal
नाशिक

Clean India Green India Awareness : नाशिकचे सायकलिस्ट करणार 6 हजार किलोमीटरचा प्रवास!

आजपासून मुंबईतून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ याविषयी जनजागृती करण्यासाठी नाशिकचे सात सायकलस्वार देशातील प्रमुख चार शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर तब्बल ६ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

या प्रवासाची सुरवात मुंबई येथून होणार असल्याने गुरुवारी (ता. १६) नाशिकमधून हे सायकलस्वार मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Clean India Green India Awareness Cyclists of Nashik will travel 6 thousand kilometers nashik news)

'स्वर्णिम चतुर्भुज’ अशी ओळख असलेल्या देशातील चार शहरांमध्ये जाताना महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाना, राजस्थान, गुजरातचा प्रवास करणार आहेत.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून शुक्रवारी (ता. १७) या प्रवासाची सुरवात होईल. चेन्नईचे मरीना बिच, कोलकत्याचा हावडा ब्रिज, दिल्लीच्या इंडिया गेटला स्पर्श करत पुन्हा मुंबईतच याची सांगता साधारणपणे ५ मार्चला होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यात चंद्रकांत नाईक, अनिल वराडे, रमेश धोत्रे, अविनाश लोखंडे, रवींद्र दुसाने, मोहन देसाई, संजय कुलकर्णी (पुणे) यांनी सहभाग घेतला आहे. गुरुवारी दुपारी ४. ३० वाजता मुंबई नाका येथून ते मुंबईकडे रवाना झाले.

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर माने, प्रसिद्ध सायकलिस्ट रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन, डॉ. मनीषा रौंदळ, साधना दुसाने, नंदू केसलाणी, भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पारनेरकर, भाजप पर्यटन आघाडीचे अध्यक्ष नंदकुमार देसाई, प्रदीप पाटील, सचिन नरोटे, ज्ञानेश्वर गायकवाड, श्री. बच्छाव उपस्थित होते. प्रवास दरम्यान सर्व सायकलिस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT