Chief Minister Eknath Shinde along with Secretary Bhausaheb Choudhary, MP Hemant Godse, Naresh Mhaske, Metropolitan Mayor Praveen Tidme, Raju Lavate etc. welcomed the entrants to Balasaheb's Shiv Sena. esakal
नाशिक

CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सलग दुसरा धक्का!

विक्रांत मते

नाशिक : डिसेंबर महिन्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत मोठे प्रवेश झाल्यानंतर त्या पाठोपाठ आता शिवसेनेला जानेवारी महिन्यात दुसरा झटका बसला आहे.

शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील चार-पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जवळपास पन्नास पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ६) मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना संघटनेत प्रत्येकाचा सन्मान राखण्याचे आश्वासन दिले. (CM Eknath Shinde Group uddhav Thackeray group second consecutive blow from Shinde group nashik news)

जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत भाजप सोबत युती केली. त्यानंतर शिंदे गट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू आहे.

पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व आमदार सुहास कांदे वगळता नाशिकमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शिंदे गटाच्या पदरात यश पडत नव्हते. त्यानंतर मात्र शहरातील जवळपास १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसला.

त्याचवेळी शिवसेनेतून आणखीन काही पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच त्या वेळचे वक्तव्य खरे ठरले.

लवकरच नियुक्त्या

प्रवेश सोहळ्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात आलेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासित करताना लवकरच नवीन नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. त्यामुळे आता शाखाप्रमुख, विभागप्रमुख तसेच सर्वात महत्त्वाचे संपर्कप्रमुख पदाची नियुक्ती केली जाईल.

मुंबई येथील बाळासाहेबांची शिवसेना भवनात झालेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ नेते राजू लवटे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, नगरसेवक सुदाम डेमसे, दिगंबर मोगरे, सचिन भोसले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

यांचा झाला प्रवेश

पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू ताकाटे, नाशिक रोड शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे, उपमहानगरप्रमुख योगेश चव्हाणके, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख रूपेश पालकर, युवासेना जिल्हा सरचिटणीस संदेश लवटे,

विभागप्रमुख नाना काळे, उमेश चव्हाण, विनोद नुनसे, प्रसन्ना तांबट, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख महेश जोशी, उपविभागप्रमुख राहुल देशमुख, युवासेना महानगर संघटक गोकुळ मते, पोलिस बॉइज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल खैरनार, युवासेना पूर्व विधानसभा प्रसिद्धिप्रमुख अंकुश बोचरे, युवासेना शहर समन्वयक आकाश काळे, महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मण पाटील,

शहराध्यक्ष मनोज उदावंत, जिल्हाप्रमुख अनिल नागरे, उपाध्यक्ष संदीप कदम, सिन्नर तालुकाध्यक्ष पंकज भालेराव, सिन्नर तालुका उपाध्यक्ष अनिल शिंदे, नाशिक रोड अध्यक्ष उमेश सोनार, जिल्हा उपाध्यक्ष संजय गवळी, उपजिल्हाध्यक्ष ग्रामीण योगेश सावकार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभिजित तागड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT