jowar roti.jpg 
नाशिक

सर्वसामान्यांची ज्वारीची 'कष्टाची' भाकर महाग...कारण.. 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अनेक वर्षांपासून निफाड तालुक्‍यात ज्वारीचा धान्य बाजार तेजीत दिसून येतो. गव्हापेक्षा ज्वारीचे भाव वाढले आहेत. परिणामी, हॉटेलमध्ये चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी महाग आहे. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत आहाराबाबत नागरिकामंध्ये जागृती झाल्याचे दिसून येते. त्यातही मधुमेही व्यक्तींना आता गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खायचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे एकूणच गव्हापेक्षा ज्वारी अधिक भाव खात आहे. 

 गव्हाची चपाती पचनात जड;

बैठ्या कामाच्या जीवनशैलीमुले पचनक्रियेचे विकार वाढले आहेत. अशा व्यक्तींसाठी चपाती पचवणे अवघडच. महाराष्ट्रीयन थाळीत चपाती हा महत्त्वाचा घटक मानला जातो. सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातून ज्वारीचे क्षेत्र अक्षरश: हद्दपार झाले. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने आता ज्वारीचा भाव चांगलाच वधारला आहे. सर्वसामान्यांची कष्टाची भाकर महाग झाली आहे. 

भाकरीमुळे वजनात घट

गतवर्षी दुष्काळ व अतिवृष्टीमुळे ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने आणि स्वस्त धान्य दुकानांतही गहू मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने ग्रामीण भागातही चुलीवर सर्रास चपाती दिसत आहे. ज्वारीच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत सातत्याने घटच होत आहे. ज्वारीमध्ये कार्बाहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीत असणाऱ्या अमिनो सीड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. तसेच फायबर असल्याने सहज चपातीपेक्षा भाकरीचे पचन चांगले होते. बद्धकोष्ठता, पित्तविकार, मुतखडा अशा रुग्णांना भाकरीचा वैद्यकीय सल्ला दिला जात आहे. आता त्यात मधुमेही रुग्णांची भर पडली आहे. 

भाकरीचा दर वधारला 
ज्वारीच्या घटत्या उत्पादनामुळे काही वर्षांत गव्हापेक्षा ज्वारीचे दर चढेच राहिले आहेत. सध्या ज्वारी 40 ते 45 रुपये प्रतिकिलो, तर गहू 25 ते 35 रुपये दराने किरकोळ बाजारात उपलब्ध आहेत. हॉटेलमध्येही रोटी व चपातीपेक्षा ज्वारीच्या भाकरीला अधिक दर लावला जातो. भाकरी करताना चपातीपेक्षा अधिक कौशल्य लागते. त्यामुळे भाकरीचे दर वधारले आहेत, असे हॉटेलचालकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT