Convocation ceremony at maharshtra Police Academy tomorrow Nashik News esakal
नाशिक

Nashik | पोलीस अकादमीत उद्या दीक्षांत सोहळा

कुणाल संत

नाशिक : येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत (maharshtra Police Academy) प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकांच्या (PSI) ११९ व्या तुकडीचा रविवारी (ता.२४) दीक्षांत संचलन सोहळा (Convocation ceremony) मुख्य कवायत मैदानावर होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip valase patil), गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil), ना. शंभुराज देसाई, पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत २१ जून २०२१ पासून ११९ व्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु होते. या तुकडीत ३१० पुरुष व १२ महिला प्रशिक्षणांर्थींचा समावेश आहे. या तुकडीत ९१ टक्के प्रशिक्षणार्थी पदवीधर व पदव्युत्तर आहेत. दहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना आंतरवर्गात भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, संहिता, भारतीय पुरावा कायदा, स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राइम, गुन्हेगारी शास्त्र, त्याचप्रमाणे बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव, योगा आदी प्रशिक्षण देण्यात आले आहे. रविवारी सकाळी आठला महाराष्ट्र पोलिस अकादमीत हा संचलन सोहळा होईल. या सोहळ्यामध्ये दीक्षांत संचलन, अहवाल वाचन, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होणार आहे.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय इमारतीचे उद्‌घाटन
महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा झाल्यानंतर बॉईज टाऊन स्कूल जवळ असलेल्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा सकाळी साडेनऊला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ, अपर पोलिस महासंचालक संजय कुमार, सहव्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आणि महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक राजेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असेल. उपस्थितीचे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते, उपप्राचार्य जॉर्ज फर्नांडिस यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT