shirdi sai 123.jpg 
नाशिक

#Coronaeffect : शिर्डीतील रामनवमीच्या उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट..साईभक्तांचा महापूर ओसरणार!

विजय पगारे

नाशिक / इगतपुरी : समस्त मुंबईकरांचे आराध्य दैवत व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुंबईच्या उपनगरांसह राज्य व शेजारील राज्यांतील विविध भागातुन रामनवमीच्या ( ता. 2 एप्रिल ) मुहूर्तावर शिर्डीकडे येणा-या शेकडो पालख्या व पायी दिंड्या येणार नसल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील व्यवसायांवरही होणार आहे.दरम्यान,शिर्डी येथील साईमंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मुंबई आग्रा महामार्गासह घोटी - सिन्नर-शिर्डी महामार्गावर एकदमच शुकशुकाट पसरला आहे.

शेकडो पालख्या व पायी दिंड्या निघणार नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान
शिर्डी येथे वर्षभरात मोजकेच उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.त्यात गुरुपौर्णिमा आणि रामनवमी उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो.या उत्सवासाठी विविध भागांसह मुंबईसह उपनगरातून शेकडो पालख्या व पायी साईभक्त येत असतात.मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे त्यामुळे रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतून निघणा-या पायी दिंड्या त्यामुळे निघालेल्या नाहीत. दरम्यान शिर्डी संस्थाननेही पायी दिंडी आयोजकांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे कळविल्याने अनेकांनी पायी दिंड्यातील गर्दी टाळण्यासाठी सामाजिक भावनेतून दिंड्या न काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

साईभक्तांचा येणारा महापूर ओसरणार

शेजारील गुजरात राज्यासह मुंबई,पनवेल,कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर, ठाणे,दादर,सायन,माटुंगा,वसई,गोरेगाव,मालाड,जोगेश्वरी,विलेपार्ले,बोरवली,अंधेरी,कांदीवली,डहाणु कसारा,शहापुर,मुरबाड,इगतपुरी,नााशिक,घोटी येथून हजारो साईभक्त पायी दिंड्यांद्वारे शिर्डीला येत असतात अनेक दिंड्यांमध्ये हजारो साईभक्त असतात.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी हजारो साईभक्त एकत्र येऊ नये यासाठी पायी दिंड्या न काढण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे.त्यामुळे यंदा शिर्डी मार्गावर पायी साईभक्तांचा येणारा महापूर ओसरणार असल्याचे दिसते.

25 - 30 वर्षांपासून येणा-या या दिंडीत खंड

दादर,परळ,वरळी,सायन,कल्याण,ठाणे,विरार,नालासोपारा,नायगाव,पनवेल ठाणे येथील साईसेवक या पायी दिंडीत दरवर्षी 5 ते 10 हजार भाविक पायी दिंडीद्वारे शिर्डीला येत असतात.या पैकी काही दिंड्यांचे रौप्यमहोत्सवी वर्ष झाले असून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पायी दिंडीवर सावट ओढावले आहे.त्यामुळे सुमारे सलग 25 - 30 वर्षांपासून येणा-या या दिंडीत खंड पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : ईश्वरपूरच्या आंबेडकरनगरात मध्यरात्री थरार! लग्न मोडल्याचा जुना राग अन् दुकानातील वाद, कामेरी नाक्यावर 31 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; कोयता, चाकूने सपासप वार

Stock Market Today: शेअर बाजारात दिवाळीसारखी तेजी! रिलायन्सचा शेअर रॉकेट; BSEवर काही मिनिटांत 4 लाख कोटींचा फायदा

शुभमन गिलचा 'मित्र' अडचणीत! अश्लील फोटो अन् तरुणीसोबतचे चॅट व्हायरल; संघासोबत तो न्यूझीलंड दौऱ्यावर

Latest Marathi News Live Update : दिवाळी हा प्रकाशाचा सण, दिया मिर्झा - जिच्या नावातच 'दिया' (दिवा) आहे - तिने हे समजून घेतले पाहिजे- शायना एनसी

Hardik Pandya Trade: हार्दिच्या बदल्यात Mumbai Indians ला हवेत KKR चे २ खेळाडू; ही ट्रेड झाल्यास मुंबईला रोखणे होईल अवघड...

SCROLL FOR NEXT