couple doctor.jpg 
नाशिक

"आता आपली खरी लढाई सुरु" टेस्ट निगेटिव्ह येताच दांपत्याचा अनोखा निश्चय!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सर्वांनाच शिक्षणाची दारे मोकळी करणाऱ्यासाठी लढणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याच्या समाजशील व शैक्षणिक कार्यातून त्यांना सर्वांनी अनुभवले. त्याच दांपत्याची प्रेरणा घेऊन निफाड येथील वैद्यकिय क्षेत्रात काम करणार एक दांपत्य मुंबई शहरातील कोरोनाच्या लढाईत रुग्णसेवा देत आहे.

"आम्ही दोघांनी मुंबई सोडून घरी यावे" कुटुंबियांचा आग्रह
मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असताना गावाकडील शेतीत वास्तव्यास असणाऱ्या घरच्या व्यक्तींना वाटत होते की आम्ही दोघांनी मुंबई सोडून घरी यावे. परंतु मी व पत्नी आम्ही दोघांनी ठरवले की आपण डॉक्टर या नात्याने नेहमी समाज सेवा करत आलो आहोत. सध्याच्या कोरोनाच्या संकटात आपल्याला देशसेवा करायची आहे असे ठरवून दोघांनी स्वँब टेस्ट केली ती टेस्ट निगेटिव्ह येताच त्यांनी तेव्हाच ठरवले की आपली लढाई आता सुरु झाली. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेत काम करीत आहोत. गावाकडे कुटूंबिय काळजी करतात पण कर्तव्यापेक्षा मोठे काहीच नाही असे वाटते. अशी भावना व्यक्त डॉक्टर संदीप रायते यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

समाजापुढे एक वेगळा आदर्श  

डॉ.संदीप बन्सीलाल रायते हे भाटिया हॉस्पिटल आणि पत्नी डॉ. मोनिका संदिप रायते, जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे नामांकित हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता रुगसेवा बजावत आहेत. रायते दांपत्यांने रुग्णसेवेचा समाजापुढे एक वेगळा आदर्श केला आहे. मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी कुंटुंबातील दांपत्य गेली तीन वर्षांपासून मुंबई राहत आहे. सध्या हे दोघेही कोरोनाग्रस्तांसाठी आपली सेवा देत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांशी निकटचा संपर्क येतो. रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे, त्यांना वेळेत औषधे देणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या आरोग्याच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेणे असे कामे हे दांपत्य करीत आहे. 

कोरोना वॉरियर्सचे अहोरात्र परिश्रम  

 साधारणपणे डिसेंबर-जानेवारीपासूनच हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये विदेशातुन आलेल्या रुग्णांचा अधिक समावेश होता. कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. आपण आणि आपला परिवार सुरक्षित राहावा याकरिता प्रत्येकजण काळजी घेत आहे. परंतू, स्वत:च्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक सुखाचा विचार न करता हे कोरोना वॉरियर्स अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्या दोघांना एकमेकांना वेळही देत येत नाही की नीट संवादही होत नाही. एकाच कुटुंबात विभक्त राहावे लागत आहे. सामंजस्य, समजूदारपणा आणि एकमेकांच्या कर्तव्याची जाणिव ठेवत हे दांपत्य कोरोनाशी लढा देत आहे.

बिल्डिंगमध्ये संसर्ग पसरण्याच्या धाकाने घरीही जाता येत नाही

डॉ. संदीप व पत्नी डॉ मोनिका हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी जेव्हा घरातून बाहेर पडतात. तेव्हा दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काळजी असते. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताना भीती या गोष्टीची असते की रोज रुग्णांच्या सहवासात राहिल्याने दोघांपैकी एक जरी पॉझिटिव्ह झाले तर घरात जेवण सुद्धा नसेल. एकमेकांसोबत थांबताही येणार नाहीत आणि ज्या बिल्डिंगमध्ये वास्तव्यास आहे त्या बिल्डिंगमध्ये संसर्ग पसरण्याच्या धाकाने घरीही येता येणार नाही. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात
मनात सतत एक धाकधूक

डॉ. संदीप हे आपत्कालीन कक्षात असल्यामुळे १६ तास कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तर डॉ. मोनिका ह्या जसलोक रुग्णालयात ८ तास ड्युटी करत कोरोना रुग्णांची काळजी घेत आहेत. हे करत असताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पीपीई किट परिधान केल्यामुळे अन्न, पाणी, प्रसाधनगृहात देखील जात येत नाही. मनात सतत एक धाकधूक असते. 

मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा वारंवार वापर

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता. मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवॉशचा वारंवार वापर केला पाहिजे. तसेच दिवसाची सुरुवात होताच दूध पिशवी, भाजीपाला हे आवश्यक साहित्य आणले जाते. ते तसेच घरात न घेता घराबाहेर एका बादलीत पाणी व मिठाच्या पाण्यात ह्या वस्तू एक तास बाहेरच राहू द्याव्या यानंतर त्या घरात घेऊन पुन्हा गरम पाण्यात धुवून वापराव्या.-डॉ.संदीप रायते, वैद्यकीय अधिकारी भाटिया रुग्णालय
 

नागरिकांनी घरातच थांबावे गरज असल्यासच घराबाहेर पडावे. नागरिकांनी बाहेर पडताना हॅन्डग्लोजचा वापर करू नये. हॅन्डग्लोज असल्याने अनेक ठिकाणी हात लागतात व तेच हात पुन्हा मास्कला लागू शकतो त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे ते टाळावे. सतत हॅण्डवॉश करणे महत्वाचे आहेत.-डॉ. मोनिका रायते, वैद्यकीय अधिकारी जसलोक रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : मागाठाणेतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेचा निषेध

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

New Year 2026 Skin Care: नववर्षात हवी ग्लोइंग स्किन? मग आत्ताच सुरू करा 'हा' 2 महिन्यांचा स्किनकेअर प्लॅन

SCROLL FOR NEXT