cow gave birth to two calves in a week nashik marathi news 
नाशिक

चमत्कारच! आठवड्याभरातच दोनदा व्यायली गाय; परिसरात ठरतोय चर्चेचा विषय

मुकुंद पिंगळे

नाशिक : येथील डॉ. इरफान खान यांच्या गोठ्यातील ११ वर्षांची गिर गाय गर्भधारणा काळ पूर्ण झाल्यानंतर व्यायली. विशेष म्हणजे पहिल्यांदा गिर जातीच्या कालवडीला तर चार दिवसानंतर पुन्हा लाल कंधारी जातीच्या गोऱ्यास तिने जन्म दिला. हा विषय नाशिकसह परिसरवासियांसाठी चर्चेचा ठरतो आहे. 

गेल्या १० वर्षांपूर्वी डॉ. खान यांनी सिन्नर(जि. नाशिक) येथून काळी गिर गायीची कालवड दीड वर्षाची असताना खरेदी केली होती. आत्तापर्यंत गायीचे ३ वित पूर्ण झाले होते. २०१६ सालापासून ती भाकड असल्याने ती माजावर येत नव्हती. यावर पर्याय म्हणून डॉ.खान यांनी पशु वैद्यकांकडून हार्मोन थेरपी केली. तसेच वैदिक पद्धतीने मूग, मठ हा खुराक सुरू करून ती माजावर आणण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गर्भधारणेसाठी गर्भाशय मसाज केला. नियमित आहारात खनिज तत्वांचा पुरवठा करण्यासह हिरवा व सुका चारा याचे आहारात नियोजन केले. त्यानंतर ६ सप्टेंबर २०२० ती व्यायली. त्यावेळी गिर जातीची कालवड जन्माला तर ४ दिवसानंतर पुन्हा लाल कंधारी जातीचा गोरा जन्माला आला. त्यामध्ये पाहिले वासरु हे शारिरीक दृष्ट्या सुदृढ सशक्त जन्माला आले तर दुसरे वासरू तुलनात्मक कमकुवत जन्माला आले. पुढे त्यास काळजी व योग्य वेळेस पाजून ते सशक्त व सुदृढ करण्यात यश आलेले आहे. डॉ. इरफान हे गेल्या १० वर्षांपासून देशी प्रजातीच्या जातींच्या गो संवर्धन कार्यात सहभागी आहेत. त्यांच्याकडे लाल कंधारी, डांगी, खिलार, गिर या प्रजाती त्यांनी सांभाळल्या आहेत. 


असे आहेत गर्भधारणा ते व्यायल्याचे टप्पे : 
- ३ डिसेंबर २०१९ : गाय माजावर 
- ४ डिसेंबर २०१९: सकाळी ९ वाजता गिर जातीच्या वळूचे वीर्य तर सायंकाळी ७ वाजता पुन्हा लाल कंधारी जातीच्या वळूचे वीर्य वापरून रेतन 
- ६ सप्टेंबर २०२०: सकाळी १०.३० वाजता गिर जातीच्या कालवडीला जन्म 
- ११ सप्टेंबर २०२० : सकाळी ६.३० वाजता लाल कंधारी जातीचा गोऱ्याला जन्म 

 
यापूर्वी अशा घटनेची लातूर जिल्ह्यात नोंद 

यापूर्वी अहमदपूर (जि.लातूर) येथे २००५ लाल कंधारी प्रजातीच्या गाय व्यायली असता, असा प्रकार १५ वर्षांपूर्वी घडल्याचे समोर आले आहे. त्याची नोंद डॉ.नितीन मार्कंडेय यांनी केली आहे. 


गर्भधारणा कालावधीत दोन गर्भ वाढत असतीलतर काही गर्भ वाढीला पूरक ठरत नाहीत, मात्र ते जिवंत स्वरूपात गर्भाशयात टिकवून ठेवले जातात. असे गर्भ पुन्हा उत्तेजित करून गर्भधारणा जरी सुरू झाली, तरी त्यांची वाढ अगदी कमी असते. यामुळेच अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या उंचीच्या, वजनाच्या गर्भाची जन्मताना निवड होते.यात गर्भाचा जन्म एकाचवेळी होणे अपेक्षित असते. मात्र प्रजननातील ठळक विकृतीमध्ये दोन प्रसूतीमधील अंतर क्वचित प्रसंगी असे वाढलेले दिसून येते, मात्र हा प्रकार सामान्य अजिबात नाही. 
- डॉ. नितीन मार्कंडेय, 'माफसू' अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी

संपादन- रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT