nashik tapovan esakal
नाशिक

Christmas Holidays : नाताळच्या सुट्यांनिमित्त पर्यटक, भाविकांची गर्दी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शनिवार, रविवार वीकेंडसह नाताळच्या सलग सुट्यांचे औचित्य साधत पंचवटीत पर्यटक, भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. सकाळपासून यात्रेकरूंचा ओघ वाढल्याने गंगाघाटावर वाहने उभी करायलाही जागा नव्हती. भाविकांच्या गर्दीने परिसरातील मंदिरांसह तपोवनातही मोठी गर्दी उसळली होती. पर्यटकांमुळे गंगाघाटासह पंचवटी परिसराच्या अर्थकारणासही काही प्रमाणात ‘बुस्ट’ मिळाला. (Crowd of tourists and devotees for Christmas holidays nashik news)

शनिवार, रविवारला जोडून आलेल्या नाताळच्या सुट्यांची पर्वणी साधत शहरात राज्यासह परराज्यांतील भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. भाविक मोठ्या वाहनांसह आल्याने सरदार चौक, साईबाबामंदिर परिसर, रामकुंड, सांडव्यावरील देवी मंदिर, खांदवे सभागृह भागात वाहनांची मोठी कोंडी अनुभवण्यास मिळाली.

रामकुंडातील पाण्याची स्थिती पाहून अनेकांनी स्नानाएवजी हात-पाय धुण्यासच पसंती दिली. तर काही ज्येष्ठांनी स्नानानंतर देवदर्शनास पसंती दिली. यानिमित्त श्री कपालेश्‍वर, काळाराम देवस्थान, सीतागुंफा, नव्याने विकसित करण्यात आलेल्या शाहीमार्गावरील स्वामिनारायण मंदिर आदींसह तपोवनात मोठी गर्दी होती.

व्यवसायात तेजी

पर्यटक भाविकांचे काल (ता. २४)पासूनच शहरात मोठ्या प्रमाणावर आगमन झाले. तर आजही भाविकांची वाहने सकाळीच गंगाघाटावर दाखल झाली. त्यामुळे येथील पाणीपुरी, चाटमसाला, भेळपुरीसह विविध हॉटेल्स गर्दीने फुलून गेली होती. याशिवाय गंगाघाटावर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही चांगला रोजगार मिळाला. मोठी वाहने गंगाघाटावर उभी करण्यात आल्यावर भाविकांनी रिक्षातून तपोवन, सीतागुंफा आदी ठिकाणी भेटी दिल्या.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पाणी सोडण्याची गरज

सलग सुट्यांचे औचित्य साधत पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने पंचवटी परिसरात दाखल झाले आहेत. यंदा जोरदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे तुडुंब भरलेली आहेत. परंतु गोदापात्रातील विसर्ग मात्र थांबविण्यात आल्याने अनेक कुंडामध्ये कचरा साठला आहे. किमान सुट्यांच्या काळातही गोदावरी प्रवाहित राहावी, अशी अपेक्षा गंगा गोदावरी पुरोहित संघासह बाहेरून आलेल्या भाविकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

स्वामिनारायण ठरले आकर्षण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अलीकडेच भाविकांसाठी खुले करण्यात आलेले तपोवनाकडे जाणाऱ्या नवीन शाहीमार्गालगतच्या स्वामिनारायण मंदिर स्थानिकांसह बाहेरील भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याठिकाणी काल व आज दोन्ही दिवस भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. तरुणाईने याठिकाणी देवदर्शनाबरोबरच परिसरात फिरून सेल्फीचाही आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT