atm center 
नाशिक

Nashik News: आधीच सुट्यांचा त्रास, त्यात नोटांचा मनस्ताप; दिवाळीच्या सणासुदीत पैशांसाठी परवड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिवाळीच्या तोंडावर बँकांना सलग सुट्या असतानाच आता ऐन सुट्यांत विविध बँकांच्या एटीएम यंत्रातून शंभर आणि दोनशेच्या नोटा येत असल्याने नागरिक त्रस्त आहे. नाशिक रोड भागात आज तर सलग ओळीने डझनहून अधिक एटीएम बंद असल्याने ग्राहकांची सणासुदीत गैरसोय झाली.

बाजारातील खरेदीच्या आनंदोत्सवाची लगबग असताना शासकीय कार्यालयासह बँकांना सुट्या आहेत. शाळांना यापूर्वीच सुट्या लागल्या आहेत. सुट्यांचा असा माहोल असताना त्यात आर्थिक चणचण हा मुद्दाही पुढे येऊ लागला आहे. (Customers are inconvenienced during festive season as ATMs are closed nashik news)

कमी मूल्यांच्या नोंटाचा भरणा ग्राहकांसाठी अडचणीचा आजपासून सलगच्या चार दिवसांच्या सुट्यांमुळे आर्थिक व्यवहारासाठी बँका बंद आहेत. त्यात लक्ष्मीपूजनासाठी कोऱ्या नोटांच्या बंडलला मागणी असते. मात्र सध्या दिवाळीपूर्वीच सुट्या सुरू झाल्याने रोकडची वानवा आहे.

वानवा दूर करण्यासाठी बहुतांश बँकांनी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांचाच अधिक भरणा केला. हा कमी मूल्यांच्या नोंटाचा भरणाही ग्राहकांसाठी अडचणीचा ठरत आहे. मध्यम स्वरूपाच्या व्यवहारासाठी पाचशेच्या नोटाच मिळत नसल्याचे शनिवारचे चित्र होते. निवृत्त प्रेस कामगार मधुकर नवघणे यांनी त्यांच्यासह इतर ग्राहकांची आपबिती सांगितली.

डिजिटल पर्याय कुचकामी

सलग चार सुट्या हेही बँकांच्या रोखतेवर मर्यादा येण्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. सध्या प्रत्येक ठिकाणी डिजिटल व्यवहाराचा पर्याय उपलब्ध असला तरी दिवाळीत हाती रोकड असणे प्रत्येकाच्या सोयीचे असते. लक्ष्मीपूजेला नोटांचे बंडल लागतात.

पाडव्याला मुहूर्ताच्या खरेदीला आणि त्यानंतर भाऊबीजेला घरातील महिलांना भेटीच्या स्वरूपात अजूनही बऱ्याच प्रमाणात रोकड नोटा देण्याला महत्त्व दिले जाते. नेमक्या याच काळात बँकांनी पाचशेच्या नोटा कमी केल्याने अडचणी आहेत.

शंभर अन् दोनशे

शहरातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्या एटीएम केंद्रांवर दर्शनी भागातच शंभर आणि दोनशेच्या नोटा असल्याच्या स्पष्टच सूचना लिहिलेल्या आहेत. आज त्याच अडचणीचा अनेकांना सामना करावा लागला. पाचशेच्या नोटा पूजा आणि इतर कामांसाठी हाताशी असाव्यात, या पारंपरिक भावनेला आज बँकांच्या एटीएम केंद्रातून तडा गेला. हीच बँक ग्राहक आणि खातेदारांची नाराजी होती. कॅनरा बँकेच्या बिटको चौकातील एटीएम केंद्रात सर्वाधिक मनस्ताप सोसावा लागतो.

"आज सकाळी मी जवळजवळ अकरा एटीएममध्ये जाऊन चेक केले. एकातूनही पैसे निघालेले नाही, म्हणजे दिवाळीच्या दिवसात बँकवाले मजा करतील, पण कस्टमरला कसा काय त्रास होईल याची नक्की काळजी घेतली जाते." - मधुकर नवघणे, त्रस्त खातेदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT