Cyber esakal
नाशिक

Nashik News : मोबाईल वापरताना काळजी घ्या : सूरज बिजली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान सायबर क्राईम या विषयाच्या अनुषंगानेही चर्चासत्र संपन्न झाले. आयटी विभागाच्या विद्यार्थी व भाविकांच्या उपस्थितीत श्री. स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीचे आबासाहेब मोरे यांनी उपस्थितीत तज्ज्ञ व सेवेकऱ्यांचे स्वागत केले. सायबर क्राईम शाखेचे सूरज बिजली आदींनी मार्गदर्शन केले. (Cyber ​​crime branch was guided by Suraj Bijli Be careful while using mobile nashik news)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिजली यांनी सांगितले की सायबर इंटरनेटचा वापर करताना आपण आपले मोबाईल वरती फोटो लॉक करा तसेच आपल्यापेक्षा इतर कोणी बघणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. तसे न केल्यास आपल्या फोटोंना इतर फोटोंबरोबर जॉईन करून गैरवापर होऊ शकतो.

तसेच सायबर प्रॉडक्टमध्ये इंटरनेट बँकिंग मोबाईल वरून ओटीपी किंवा इतर ॲप्लिकेशन लोड न करता व ओटीपी कोणाला न देता विना ओळखीची लिंक डाउनलोड न करता आपण आपल्या इंटरनेटचा किंवा मोबाईलचा वापर करावा, असे आव्हान बिजली यांनी केले.

ओमकार गंधे सायबर सुरक्षा तज्ज्ञ यांनी ब्लूटूथ, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याबाबत काळजी घेऊन कॉम्बिनेशन पासवर्ड, सायबर क्राईम साक्षरता या बाबत सतर्कता कशी बाळगावी, असे सांगितले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

आबासाहेब मोरे यांनी सांगितलं की केंद्राच्या वतीने आयटी विभाग हा सूर्यासारखा तेजस्वी असून आपण जागृत राहून त्याचा योग्य ठिकाणी वापर केल्यास क्रांती होईल.

नेटवर सर्व प्रकारची आध्यात्मिक कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञान याबाबतची सर्व माहिती उपलब्ध असून त्याचा उपयोग करून घ्या. आपण माहिती व तंत्रज्ञान किंवा चित्रपटाचा योग्य पद्धतीने आपल्या मनात अनुकरण करण्याची मानसिकता तयार केली तर चांगल्या प्रकारे सुजाण नागरिक घडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT