Pharmacy esakal
नाशिक

Nashik News : राजापूर-पन्हाळसाठे शिवारामध्ये होणार डी., बी.फार्मसी कॉलेज; फार्मसी कौन्सिलची मान्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्याच्या पूर्व भागातील पन्हाळसाठे- राजापूर शिवारात संतोषीमाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डी.फार्मसी व बी.फार्मसी महाविद्यालयाला परवानगी मिळाली आहे.

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने त्यासाठी मान्यता दिल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण दराडे यांनी दिली. (D B Pharmacy College will be held in Rajapur Panhalsathe Shivar nashik news)

आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, संचालक लक्ष्मण दराडे व रामदास दराडे आदींच्या पुढाकारातून बाभूळगाव येथे मागील पंचवीस वर्षापासून जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेने टप्याटप्याने केजी टू पीजीपर्यंत अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. धानोरे तसेच एकलहरे येथेही नव्याने कॅम्पस सुरू होऊन तिथेही परिपूर्ण भौतिक सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था सुरू आहे.

दराडे बंधूंच्या पुढाकाराने ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थेचे अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिक्षणशास्त्र, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, फार्मसी, कृषी महाविद्यालय, नरसिंग महाविद्यालय, बीएचएमएस, बीएएमएस आदी महाविद्यालय सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामाध्यमातून जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नामांकित कंपन्यांत नोकरी करत आहेत. आपल्या व्यवसायात नावलौकिक करून यशस्वी झाले आहेत. या पाठोपाठ आता नंदुरबार येथेही संस्थेचा भव्य कॅम्पस यावर्षी सुरू झाला आहे.

राजापूर शिवारातील पन्हाळसाठेजवळ नव्याने विकसित होत असलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये डी व बी फार्मसीला फार्मसी कौन्सिलने मान्यता दिली आहे. येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया देखील राबविली जाणार असून सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक रूपेश दराडे यांनी केले आहे.

पन्हाळसाठे येथे तंत्रनिकेतन, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, कृषी आदी महाविद्यालय प्रस्तावित असून त्यालाही मान्यता मिळून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा या ठिकाणी मिळणार असल्याचे रूपेश दराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT