Dada Bhuse news 
नाशिक

Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणात एकमेकांवर चिखलफेक, मूळ विषय बाजूला : पालकमंत्री भुसे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या ललित पाटील याच्यासोबत सोशल मीडियावर वायरल होत असलेला फोटो मी नाकारत नाही.

मी विनायक पांडे यांच्या माध्यमातून पाटील याला शिवसेनेत प्रवेश दिला होता, त्या वेळी मीदेखील उपस्थित होतो, असे स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी देताना ड्रग्ज प्रकरणात एकमेकांवर चिखलफेक करून मूळ विषय बाजूला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. (dada bhuse statement about nashik drug case news)

एमडी ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आल्यावर भुसे यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, की २०१६ मध्ये विनायक पांडे यांच्या माध्यमातून ललित पाटील याने शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी मी राज्यमंत्री होतो.

जिल्ह्यातील प्रमुख म्हणून मी तेथे उपस्थित होतो. २०२० मध्ये पुण्यात नवीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. मी २०२२ मध्ये पालकमंत्री झालो. त्याच्याशी माझा संबंध येण्याचा प्रश्नच येत नाही. काही बाबींसंदर्भात पातळी राखण्याची गरज आहे. ड्रग्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश मी पोलिसांना ५ ऑक्टोबरलाच दिले आहेत.

नाशिकची संस्कृती अशा प्रकारची नाही, त्यात राजकारण आणू नये.

पक्षाच्या पलीकडे जाऊन एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत यांनी सुषमा अंधारे यांना बोलायला लावले आहे, त्यांना आता मालेगावला यावे लागणार आहे. त्यामुळे अंधारे यांच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर आरोप केल्याचा दावा भुसे यांनी केला.

मूळ विषयाला बगल देण्याचा हा प्रयत्न असून, आता आरोपींचा शोध घेणे महत्त्वाचे आहे, त्यांची चौकशी केल्यानंतर सत्यसमोर येईल. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली, हे चांगले आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र ड्रग्ज प्रकरणात राजकीय चिखलफेक करणे योग्य नसल्याचे ते या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT