Dada Bhuse  esakal
नाशिक

Dada Bhuse News : शेतकऱ्यांना 2 टप्प्यांत कांद्याचे अनुदान : पालकमंत्री भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या अनुदानात कुणीही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनुदान वाटपात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. भुसे यांनी केले. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको, याबाबत संबंधित यंत्रणेलाही त्यांनी सूचना केल्या. (dada Bhuse statement about Onion subsidy to farmers nashik news)

४३५ कोटींचे अनुदान

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यानुसार ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्च २०२३ ला घेतला. क्विंटलला ३५० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज केले.

दुसरा हप्ता लवकरच

या मदतीपासून वंचित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत हे अनुदान देण्यात येणार असून, दुसरा हप्ताही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योग्य खाते क्रमांक नसल्यास संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून योग्य खाते क्रमांक घेण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सरकारने घोषणा केल्यानुसार ३ ते ३० एप्रिलदरम्यान शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षकांतर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT