Dada Bhuse esakal
नाशिक

Dada bhuse : दोन दिवसात पंचनामे पूर्ण करा : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गारपीट व अवकाळी पावसामुळे तालुक्यात नुकसान झालेल्या २२ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे पुढील दोन दिवसात पूर्ण करा, ऑगस्ट २०२३ अखेर पिण्याचे पाणी कसे पुरेल यासाठी पालिका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिल्या . (Dada Bhuse statement about unseasonal rain damage Panchnama nashik news)

शनिवारी (ता.२२) येथील प्रांत कार्यालयात पालकमंत्री भुसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप बोरसे, प्रांताधिकारी बबनराव काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, कृषी अधिकारी प्रणय हिरे उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, अवकाळी व गारपिटीने कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येणारे दोन हंगाम वाया जाणार आहेत. नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेण्याचे आदेश श्री. भुसे यांनी दिले.

आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे अट रद्द करावी या मागणीचा पुनरुच्चार करीत कार्यवाहीची मागणी केली. महाराजस्व अभियान राबविण्यासाठी वीरगाव, पठावेदिगर या दोन गटांपासून सुरवात करण्याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पांडुरंग कोल्हेंविरूद्ध तक्रारीचा पाऊस

तालुक्यातील विरगाव, वटार, वनोली ,करंजाड, डांगसौंदाणे आदी सरपंचांनी पालकमंत्र्यांकडे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत मातोश्री पाणंद रस्ते, बैलगोठे या रोजगार हमीच्या कामांसाठी पंचायत समितीत अडवणूक करत असल्याचा आरोप केला. कामे होत नसल्याने आम्हाला मतदारांच्या रोषाला तोंड द्यावे लागत असल्याची कैफियत मांडली. यावर श्री. भुसे यांनी गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांना कामांना गती देण्याच्या सूचना देत तक्रार आल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला.

पाण्याचे योग्य नियोजन करा

यंदा पावसाळा उशिराने असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट करत प्रशासनाने धरणातील पाणीसाठा तपासून पाण्याचे नियोजन करताना ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी कसे पुरवता येईल याचा विचार करावा. चाऱ्याची काय परिस्थिती आहे याचे देखील नियोजन करून त्याबाबतचा अहवाल द्यावा अशा सूचना केल्या .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT