Guardian Minister Dada Bhuse during the preparatory meeting of the Dussehra gathering organized by Shiv Sena's Shinde group on Saturday. Neighbor officials. esakal
नाशिक

Dada Bhuse News: शिवसेनेच्या आझाद मैदान मोर्चाला नाशिकमधून सर्वाधिक शिवसैनिक : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Shinde Group Dasara Melava : शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे आझाद मैदानावरील मेळाव्याला नाशिकमधूनच सर्वाधिक शिवसैनिक जाणार असून, ड्रग्ज प्रकरणात राज्याच्याच काय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चौकशीलाही तयार असल्याचा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केला.

या प्रकरणातील संशयित आरोपी ललित पाटील याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले होते. त्या वेळी खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख असल्याची पुस्ती भुसे यांनी जोडली. (Dada Bhuse statement Shiv Sena Azad Maidan Morcha has most Shiv Sainiks from Nashik news)

ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महामोर्चा काढण्यात आला. त्यात खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांसह पालकमंत्री व भाजपच्या आमदारांवरही आरोप केले. त्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यानिमित्त आयोजित बैठकीनंतर पालकमंत्री भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, की मोर्चाच्या निमित्ताने राऊत हे मुंबईहून कृत्रिम आविर्भाव आणून नाशिककरांची बदनामी करायला आले होते. सन २०१६ दरम्यान ते शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ललित पाटीलचा तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

त्या वेळी मी राज्यमंत्री होतो. राज्यमंत्री या नात्याने मी तेथे हजर होतो. ललित पाटीलला पक्षात आणणारा प्रमुख नेता कोण होता, कोणत्या नेत्यामुळे प्रवेश झाला, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भुसे यांनी केली.

राऊत यांनीही चौकशीला तयार राहावे

ड्रग्ज प्रकरणात राज्याच्याच काय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही चौकशीला मी तयार आहे, मात्र माझ्याबरोबरच चौकशीची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनीही चौकशीला तयार असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान भुसे यांनी दिले.

जिल्ह्यातून १५ हजार शिवसैनिक

शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे विजयादशमीला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर जिल्ह्यातून १५ हजार शिवसैनिक जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यासंदर्भात पक्षाच्या मायको सर्कल येथील कार्यालयात बैठक झाली.

या वेळी शिवसेना नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे, खासदार हेमंत गोडसे, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, काशीनाथ मेंगाळ, राजाभाऊ सोनवणे, गणेश कदम, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, संजय दुसाने, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, दिगंबर मोगरे, शशिकांत कोठुळे, महेश जोशी, प्रमोद लासुरे, शिवाजी भोर, भाऊसाहेब निकम, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाबूराव आढाव, रोशन शिंदे, प्रताप मेहरोलिया, नगरसेवक सूर्यकांत लवटे, आर. डी. धोंगडे, चंद्रकांत खोडे, उत्तम दोंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर, उपमहानगरप्रमुख सुधाकर जाधव, नाना काळे, अरुण घुगे, आदित्य सरनाईक, सचिन भोसले, नितीन साळवे, शरद देवरे, युवासेना जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, महानगरप्रमुख शुभम पाटील, महिला आघाडी ग्रामीण जिल्हाप्रमुख रोशनी कुंभार्डे, मंगला भास्कर, महानगर संघटक अस्मिता देशमाने, ज्योती फड, सुलोचना मोहिते, अर्चना मगर, सरला चव्हाण, मंजूषा पवार, शुभांगी गुंजाळ आदी उपस्थित होते.

मेळाव्यास ठाणे जिल्ह्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सर्वांत जास्त शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी मेळाव्याच्या दिवशी लवकर निघण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख तांबडे व अनिल ढिकले यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT