Water accumulated in maize fields due to unseasonal rains. The damaged cabbage in the second photo. esakal
नाशिक

Heavy Rain Crop Damage : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी; शेतकऱ्यांसमोर संकट

सकाळ वृत्तसेवा

वाखारी (जि. नाशिक) : वाखारी, भिलवाड, कापशी, मकरंदवाडी, भावडे परिसराला पावसाने मागील चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कांदा, मका असल्याने वेळोवेळी पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण केली आहे. (Damage to crops due to return heavy rain at vakhari area farmers in Crisis Nashik Latest Marathi News)

पावसाच्या अवेळी येण्याने शेतातील तयार माल घरापर्यंत आणणे कठीण झाले आहे. या पावसाने शेतकरी वर्गाची पिके पाण्यात गेली. यंदाच्या सततच्या अवकाळी पावसाने परिसरातील सरासरी उत्पन्नात घट होईल. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. भाव वाढेल व आपला झालेला खर्च वजा करून थोडेफार पैसे पदरात पडतील. लेकरा बाळांची दिवाळी आनंदाने साजरी करू, या आशेने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे.

शेतात काढणीसाठी उभा असलेला मका, बाजरी काढता येत नाही. काही ठिकाणी संपूर्ण शेतच पाण्याने उपळून निघाल्याने उभी पिके सडत आहेत. भविष्यात चाऱ्याचे दर वाढून शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड होणार आहे. परिसरात टोमॅटो, कोबी, कांदा, मका, बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

मोठ्या प्रमाणात शेतीवर झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बळीराजावर आलेल्या या संकटाचे परिणाम बाजारपेठावर दिसू लागले आहेत. तालुक्यातील छोटे- मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शेतकरी वर्गाकडे पैसाच नसेल तर छोटे- मोठे शेतीपूरक व्यवसाय चालणार कसे, असा प्रश्‍न आहे.

दिवाळी सणासाठी कपडे, किराणा, फटाके व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवला आहे. परंतु, आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाने आर्थिक खर्चाला हात आखडता घेतला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT