Sunil Gaikwad, founder president of Ekta Mandal, Malegaon City, along with office bearers while addressing the press conference. esakal
नाशिक

Nashik News: रशिया, इजिप्तचे नृत्यपथक मालेगावी! एकता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची आगळी परंपरा कायम

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : शहरातील सटाणा नाका भागातील एकता मंडळाच्या गणेशोत्सवाची ३४ वर्षांची अखंड परंपरा कायम आहे.

यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण परदेशी पाहुणे कलाकार असणार असून रशिया व इजिप्त येथील नृत्यपथक शहरात दाखल झाले असल्याची माहिती मंगळवारी (ता.२६) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत एकता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी दिली.

गुरूवारी (ता.२८) गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीची सर्वत्र धामधूम असते. मालेगावात प्रथमच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास रशिया व इजिप्त या देशातील नृत्यांगना पथक शहरात दाखल होणार आहे. (Dance troupe of Russia Egypt Malegavi tradition of immersion procession of Ekta Mandal continues Nashik News)

दरवर्षी एकता मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. विशेष म्हणजे कसमादे भागातील लक्षवेधक गणेशोत्सव म्हटल्यावर गणेश भक्तांना एकता मंडळाचे उपक्रम आकर्षण ठरले आहे.

गणेशोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी विविध राज्यांतील वेगळं आकर्षण असलेल्या पथकांना पाचारण करण्यात आले. यंदा परदेशस्थ कलाकारांना आमंत्रित करून ऐतिहासिक सोहळा करण्याबाबत नियोजन पूर्ण झाले आहे.

या मिरवणुकीत पोलिस बंदोबस्तात शिवाय मंडळाचे पाचशे स्वयंसेवक ओळखपत्र ड्रेस कोडसह सज्ज असतील. या भव्य मिरवणुकीत बाप्पांच्या निरोपासाठी शंभर शंभर संचाचे दोन पथक नेतृत्व करणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध भागातील कलाकारांचा जत्था आमंत्रित करण्यात आला आहे. जवळपास अठरा पथके असले तरी शासनाच्या वेळेनुसार मिरवणूक शिस्तीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होणार असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागातील, शहरातील व कसमादे मनमाड भागातील गणेशभक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री गायकवाड यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला एकता मंडळाचे पदाधिकारी प्रीतेश गायकवाड, कल्पेश शेलार, सागर आघारकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

▪️विशेष आकर्षण:

रशियन कार्निवल बॅंड

इजिप्त तनुरा डान्स

पुणेरी ढोल पथक

नाशिक ढोल पथक

कोळी ग्रुपनृत्य

लेझीम पथक

बाहुबली हनुमान

विराट भोलानाथ

झांज व डमरू पथक

अघोरी पथक

शौर्य पथक

बॅालीवुड पथक

कोल्हापुरी हलगी पथक

आदिवासी पथक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT