ratna m.png
ratna m.png 
नाशिक

ह्रदयद्रावक! वडीलांच्या निधनाच्या दुःखात लेकीचीच निघाली अंत्ययात्रा; वडिलांच्या दशक्रियेसाठी लेकीची वाट बघणाऱ्या कुुटुंबाचा आक्रोश;

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : वडील वारल्याचे दुःख...त्यात दशक्रियेला जायची इच्छा लेकीची राहूनच गेली. कारण नियतीचा फासा असा उलटा पडला की लेकीलाच वडिलांकडे कायमचा घेऊन गेला. दशक्रियेसाठी जात असताना पुन्हा एकदा कुटुंबीयांना मुलीच्या मृत्यूची बातमी आल्याने महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

असा घडला प्रकार

वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी जाणाऱ्या सिडकोतील महिलेचा रविवारी (ता. १०) ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. येथील उत्तमनगर, श्रीराम मंदिर चौकात राहणाऱ्या रत्नाबाई प्रवीण महाजन (वय ३७) पती प्रवीण महाजन यांच्यासमवेत चोपड्याजवळील अडावद येथे वडील पांडुरंग महाजन यांच्या दशक्रियेसाठी दुचाकीवरून जात होत्या. गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर चोपडा रोडवर गतिरोधकावर त्यांची दुचाकी जोरात उडाली व त्या रस्त्यावर पडल्या. याच क्षणी मागून येणाऱ्या ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यात रत्नाबाई महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण महाजन बाजूला पडल्याने ते वाचले. वडील वारल्याचे दुःख सोबत घेऊन त्यांच्या दशक्रियेसाठी जात असताना पुन्हा एकदा कुटुंबीयांना मुलीच्या मृत्यूची बातमी आल्याने महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेने हळहळ व्यक्त

रत्नाबाई महाजन यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार असून, मुलगी नुकतीच दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली, तर मुलगा नववीत शिकत आहे. या घटनेने सिडको भागात हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन - ज्योती देवरे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT