bharti 123.jpg
bharti 123.jpg 
नाशिक

नायलॉन मांज्याने मृत महिलेच्या कुटूंबीयांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; सिव्हिलमध्ये नागरिकांचा ठिय्या  

युनूस शेख

नाशिक : मृत महिलेचा घटस्फोट झाला होता. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी असल्याने त्या कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांच्या मृत्यूस प्रशासनाची हलगर्जी कारणीभूत आहे. अशाप्रकारे महिलेच्या नातेवाइकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण

हिरावाडी येथील भारती मारुती जाधव (वय ४६) यांचा नायलॉन मांजाने सोमवारी (ता. २८) मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २९) जिल्हा रुग्णालय आवारात ठिय्या देत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासह नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. महिलेच्या नातेवाइकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. सरकारवाडा तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी आणि साजन सोनवणे घटनास्थळी दाखल झाले.

प्रशासनाने जबाबदारी घेत आर्थिक मदत करावी.

मृत महिलेचा घटस्फोट झाला होता. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी असल्याने त्या कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांच्या मृत्यूस प्रशासनाची हलगर्जी कारणीभूत आहे. त्यांच्या मुलाचे शिक्षण, आरोग्य व नोकरीची जबाबदारी प्रशासनाने घेत आर्थिक मदत करावी. नायलॉन मांजा विक्रीस २०१६ पासून बंदी आहे. तरीही शहरात सर्रासपणे विक्री होत आहे. मांजामुळे कोणाचाही बळी जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, वन विभाग तसेच पोलिस विभागाने योग्य खबरदारी घेत कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन साजन सोनवणे यांना देण्यात आले.

माजी आमदार अनिल कदम, बसपचे नाशिक मध्यचे अध्यक्ष दीपक डोके, नारायण गायकवाड आदी उपस्थित होते. तहसीलदार अनिल दौंडे यांनी आंदोलकांची भेट घेत आर्थिक मदतीसह मांजा विक्रेत्यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी मृतदेह ताब्यात घेत आंदोलन मागे घेतले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT