Deepika Chavan esakal
नाशिक

Nashik Onion Subsidy : शासनाकडून कांदा उत्पादकांची फसवणूक : दीपिका चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकट असताना १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ३५० रुपयांचे अनुदान जमा करण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. (deepika chavan statement about state government cheated farmers nashik news)

शासनाने नाफेडचा कांदा बाजारात आणू नये तसेच येत्या आठ दिवसात शेतकऱ्‍यांच्या बँक खात्यांवर अनुदानाची रक्कम वर्ग करावी अन्यथा मंत्र्यांना तालुका बंदी करून सर्व शेतकऱ्यांसोबत बागलाणमधील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण पत्रकार परिषदेत दिला

जानेवारी महिन्यापासून सातत्याने कोसळणारा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचा पन्नास टक्के कांदा चाळीतच सडून गेला. सहा महिन्यांपूर्वी कांद्याला ३५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झाला. मात्र त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्‍यांच्या बँक खात्यांवर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र अजूनही अनुदान मिळालेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमध्ये मातीमोल दराने विक्री होत आहे. त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचीही मदत झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या १०-१२ दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या चांगला भाव मिळत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्याची संधी निर्माण झाली आहे.

मात्र केंद्र सरकारने यावर्षी नाफेड व एनसीसीच्या माध्यमातून तीन लाख टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक केला. बफर स्टॉकमधील हा कांदा मोदी सरकारने बाजारात उतरविण्याची तयारी केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडेल. दर सुधारताच केंद्राकडून ते पाडण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना केल्या जातात. केंद्र सरकारचे हे धोरण शेतकरीविरोधी असून, या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण होत आहे.

त्यामुळे नाफेडचा कांदा बाजारा आणू नये तसेच कांदा अनुदान आठ दिवसात खात्यावर वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली. या मागण्यांचा विचार न झाल्यास मंत्र्यांना तालुका बंदी करून सर्व शेतकऱ्यांसोबत बागलाणमधील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

"कमी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट असल्याने नाफेडचा कांदा बाजारात आणू नये यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांची भेट घेऊन कांदा उत्पादकांच्या समस्या बाबत चर्चा करणार आहे." - दीपिका चव्हाण, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT