Crime news
Crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : CM शिंदे यांच्या बद्दलचा व्हिडिओ फेसबुकवर टाकून बदनामी; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर) येथे शनिवारी झालेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेसह उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ फेसबुक या समाज माध्यमावर चुकीच्या पद्धतीने प्रसारित करून मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी नांदूरशिंगोटे येथील संदीप चंद्रभान शेळके याचे विरोधात वावी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Defamation by uploading video about CM Shinde on Facebook Filed case against person at nandur shingote Nashik Crime News)


हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

शिंदे सेनेचे शरद शिंदे यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली. मुख्यमंत्री शिंदे हे नांदूर शिंगोटे येथे आल्यावर त्यांच्यासमोर उपस्थित जमावाने ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ संदीप शेळके या व्यक्तीने त्याच्या फेसबुक पेजवरून अपलोड केल्याचे शरद शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

वास्तविक पाहता अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नांदूर शिंगोटे येथील दौऱ्याच्या वेळी देण्यात आल्या नव्हत्या. साक्षीदार शरद कातकडे यांनी देखील तसे सांगितले. मात्र, लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड केला असून त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय सोनवणे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT