2spicejet_0.jpg
2spicejet_0.jpg 
नाशिक

नाशिकहून दिल्ली-हैदराबादसाठी २२ नोव्हेंबरपासून हवाई सेवा; अशा असतील वेळा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिकहून दिल्ली व हैदराबाद येथे २०, तर दिल्लीसाठी २५ नोव्हेंबरपासून स्पाइस जेटमार्फत हवाई सेवा सुरू होणार असून, या सेवेस प्रतिसाद मिळाल्यास गोवा, चेन्नईसाठी हवाई सेवा सुरू करण्याचे आश्‍वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

स्पाइस जेट कंपनी हवाई सेवा सुरू करीत असून, सेवा निरंतर सुरू राहण्यासाठी स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील आयमा रिक्रिएशन सेंटरमध्ये औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. खासदार हेमंत गोडसे, ‘आयमा’चे अध्यक्ष वरुण तलवार, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ‘नाइस’चे उपाध्यक्ष रमेश वैश्य, स्पाइस जेट कंपनीचे वितरण व्यवस्थापक किन्नरी मेहता, सुशील धुमाळ, भाविक ठक्कर, ‘आयमा’चे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, ‘तान’चे दत्ता भालेराव, आयमा एव्हीएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावळ उपस्थित होते.

हवाई सेवेचा विस्तार

नाशिकहून दिल्ली, हैदराबाद व बेंगळूरूसाठी हवाई सेवा सुरू करताना आनंद होत असून, नाशिकच्या विकासाला पूरक सेवा राहील, असा विश्‍वास कंपनीचे सेल्स व्यवस्थापक किनारी मेहता यांनी व्यक्त केला. पुढील दहा दिवसांत उद्योजक संघटनांनी केलेल्या मागण्या व समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पहिल्या टप्प्यात हैदराबाद व दिल्ली सेवा दिली जाईल. प्रतिसाद मिळाल्यानंतर अन्य शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

अशा असतील वेळा

२० नोव्हेंबरपासून हैदराबाद-नाशिक सेवा सुरू होईल. हैदराबाद येथून सकाळी १०.३५ ला नाशिककडे उड्डाण होईल. दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी ओझर विमानतळावर पोचेल. ओझरहून दुपारी १२.३५ वाजता हैदराबादकडे उड्डाण झाल्यानंतर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोचेल. बेंगळुरूवरून सकाळी ११.२० ला ओझरकडे उड्डाण होईल. दुपारी १२.२५ ला पोचेल. नाशिक हून १२.५५ ला बेंगळूरूकडे उड्डाण होईल. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोचेल. २५ नोव्हेंबरपासून दिल्ली सेवा सुरू होईल. दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी ओझरकडे उड्डाण होईल. सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी पोचेल. सायंकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीकडे उड्डाण होईल. सात वाजून २५ मिनिटांनी दिल्लीत पोचेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT