debt waiver scheme esakal
नाशिक

Nashik : 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी

भारत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : शिवसेना-भाजप (Shiv sena-BJP) सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना (Debt waiver scheme) सुरू केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील कर्ज भरावे. त्यानंतर उरलेल्या दोन लाखांवर कर्जमाफी दिली जात होती. आता ती दोन लाखांची कर्जमाफीची योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. (Demand for resumption of loan waiver scheme up to Rs 2 lakh Nashik News)

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असला तरी या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. जे नियमित कर्जदार आहे, त्यांच्यासाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार होते. अद्याप ते दिलेले नसले तरी ते देण्याच्या दृष्टिकोनातून बँकांना आदेश दिल्याचे समजते. मात्र, त्यातही सलग तीन ते चार वर्षापासून कर्ज परतफेड करणारे शेतकरी असावे, अशी अट आहे. त्यामुळे या योजनेतही अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. कोरोनाकाळात अनेक शेतकरी बाजारभावामुळे अडचणीत आले. एका बाजूला महागाई असताना दुसरीकडे शेतीमालाचे भाव फारसे वाढले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्यावर जितके कर्ज आहे, त्यापैकी दोन लाखांवरील कर्ज भरण्यास अनेक शेतकरी तयार आहेत. मात्र महाविकास आघाडीने दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

"मौजे सुकेणे-कसबे सुकेणेतील अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत. दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी दोन लाखांवरील सर्व कर्ज भरण्यास तयार होतील. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होऊन ते कर्जमुक्त होतील."

- विजय मोगल, माजी उपसरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT