Maratha Reservation Manoj Jarange patil esakal
नाशिक

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा मुद्दा बुधवारी (ता. १) खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी नेला. खासदार गोडसे यांनी बुधवारी दिल्लीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेचे अधिवेशन बोलविण्याची मागणी केली.

(Demand for Special Session of Parliament on Maratha Reservation Question nashik news)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सुरू असलेली आंदोलने, विविध ठिकाणी होणाऱ्या हिंसक घटना तसेच मराठा समाजाला आरक्षणाची गरज याविषयी खासदार गोडसे यांनी सभापती बिर्ला यांना हा विषय निकाली काढण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली. दरम्यान, आरक्षणाचा मुद्दा लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती बिर्ला यांनी स्पष्ट केल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार आणि राज्यकर्त्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने आरक्षणाची घोषणा केली होती. परंतु न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण बाद झाले होते. दरम्यानच्या काळात राज्यभर समाजाने मूकमोर्चा काढत आरक्षणाच्या मुद्याकडे राज्यकर्ते आणि शासनाचे लक्ष केंद्रित केले होते.

काही दिवसांपासून समाजाच्या चळवळीत नेटाने काम करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषणास सुरवात केल्याने मराठा समाजात असंतोषाचे वातावरण आहे. खासदार गोडसे यांनी बुधवारी दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पूर्वी एका शेतकऱ्याकडे दहा ते वीस एकर शेती असायची.

परंतु वाढत्या कौटुंबिक व्यवस्थेमुळे आज एका शेतकऱ्याकडे अवघी दोन, तीन एकरच शेती शिल्लक राहिल्याने राज्यातील मराठा समाजाचे शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत.

आधीच सरकारी नोकऱ्यांचा तोटा त्यात आरक्षण नसल्याने शैक्षणिक आणि नोकऱ्यांपासून समाजातील तरुणांना वंचित राहावे लागत आहे. त्यातच दहा ते बारा वर्षांपासून राज्यामध्ये पडणारा अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे मराठा शेतकरी कर्जाच्या खाईत असल्याचे सभापती बिर्ला यांच्या लक्षात आणून दिले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु काही केल्या जरांगे पाटील उपोषण स्थगित करण्यास तयार नसल्याने राज्यात विविध ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी सभापती बिर्ला यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT