Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
नाशिक

Devendra Fadnavis : सिंहस्थ आराखडा तातडीने सादर करा : उपमुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadnavis : सन २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालो नसतो तर दत्तक पिता काय काम करू शकतो, हे नाशिककरांना दाखवून दिले असते असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरा बदलण्याचे आश्वासन दिले.

सिंहस्थ संदर्भातील आराखडा गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शिखर समितीच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नाही. (Deputy Chief Minister Fadnavis statement of Submit Simhastha kumbh mela Plan urgently nashik news)

यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या विकास निधीतून साकारलेल्या राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसस्थानकाचे लोकार्पण व विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.१०) झाला.

मेळा बस स्थानकाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर, उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की अयोध्येइतकेच नाशिकचे महत्त्व आहे. हिंदुत्व सांगणाऱ्या सावरकरांचाही या भूमीशी संबंध आहे.

त्यामुळेच अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवसीय अनुष्ठानाची सुरवातही नाशिकमधून केली. सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा या कुंभमेळ्याला भाविक व साधू महंतांची गर्दी वाढेल. त्यामुळे त्यांच्यासाठी सुविधा पुरवाव्या लागतील.

त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे. समितीने सिंहस्थ कामांचा समग्र विचार करून प्रारूप आराखडा सादर करावा. पुण्याच्या धर्तीवर नाशिकच्या बाह्य रिंगरोडचा विकासही या निमित्ताने केला जाईल. या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळेल.

पंचवटीत आमदार राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीरामाची ७१ फुटी प्रतिमा नाशिककरांचे आकर्षण ठरेल तर अटल स्वाभिमान भवनच्या माध्यमातून दिव्यांगांना प्रशिक्षण व सेवा सुविधा उपलब्ध होतील.

आमदार फरांदे यांनी प्रास्ताविकात आगामी कुंभमेळा व बाह्य रिंग रोडसाठी निधीची मागणी केली. भुजबळ यांनी आरोग्य विद्यापीठाचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला गती देण्याची मागणी केली. पालकमंत्री भुसे यांनी सिंहस्थ आराखडा लवकरात लवकर तयार केला, जाईल असे सांगितले.

नाशिक- पुणे रेल्वे मार्गात बदल

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत फडणवीस म्हणाले की या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याने नाशिक-शिर्डी-पुणे अशा पर्यायी रेल्वे मार्गाचा विचार सुरू आहे. नवीन मार्गामुळे नाशिक व पुण्याचे अंतर ३३ किलोमीटरने वाढेल. मात्र नाशिक व पुण्याचा शिर्डीलाही फायदा होईल. या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करणार आहे. रेल्वे मार्गामुळे नाशिक व पुणे अंतर दोन तासांवर येईल.

निओ मेट्रोचा ५० टक्के खर्च

नाशिकच्या मेट्रोचा आराखडा अंतिम करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने समिती गठित केली आहे. नाशिकसह देशातील अन्य पंधरा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. नाशिकमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्याची विनंती केंद्र सरकारला केली असून त्यासाठी प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य शासन उचलणार आहे. आराखडा निश्चित झाल्यानंतर मेट्रोचे काम सुरू होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

राज्यात पहिल्या दिव्यांग भवनाचे लोकार्पण

प्रभाग क्रमांक २३ मधील भारत नगर येथे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नांतून राज्यातील पहिले दिव्यांग प्रशिक्षण व विविध उपचार सेवा सुविधा केंद्र तयार झाले असून त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. अटल स्वाभिमान भवन या प्रशिक्षण व उपचार केंद्रामध्ये तळमजला व चार मजले आहेत.

त्यात तळमजल्यावर प्रवेश क्षेत्र, बैठक हॉल, ऑडिओ टेस्टिंग आणि स्पीच थेरपी सेंटर, फिजिओथेरपी सेंटर स्वीमिंग पूल, ऍक्टिव्हिटी रूम, फ्री ऑफिसर सेंटर, मल्टीपर्पज डिसॲबिलिटी कक्ष, संगणक कक्ष ट्रेनिंग रूम, प्रोजेक्टर रूम, संगीत खोली, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, ट्रेनिंग रूम, लायब्ररी, स्टोअर रूम, ड्रेसिंग रूम सुविधा आहे. या वास्तूचा राज्यातील दिव्यांगांना उपयोग होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT