Panchavati: A garbage empire spread over Dindori Road esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरी, पेठ रोडवरील ब्लॅक स्पॉट जैसे थे

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : महापालिकेने जाहीर केलेले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट अद्यापही कायम असून, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यात दिंडोरी व पेठ रोडवरील काही ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी कायमच कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे स्वच्छता मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

नाशिकच्या पंचवटीत जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दिंडोरी व पेठ रोड मार्गे गुजरातहून येणाऱ्या भाविकांना मात्र शहरात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर पोचताच कचऱ्याचे दर्शन घडत आहे.

तसेच, शहरातील नित्याने ये- जा करणारे पादचारी व वाहनचालकांनाही रोजच हे चित्र बघावयास मिळते. यामुळे साठलेला कचरा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Dindori Peth Road Garbage Problem Not solved ignorance of municipal corporation nashik news)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

कचऱ्याचे ग्रहण सोडवावे

ज्या वेळी पंचवटी विभागीय कार्यालयात प्रभाग सभा होत असे, त्या वेळी कचऱ्याच्या मुद्द्यावरून स्वच्छता विभागास माजी लोकप्रतिनिधी नेहमीच धारेवर धरत होते. परंतु, निवडणुका लांबणीवर पडत आहेत. यामुळे एकप्रकारे प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येते. स्वच्छ भारत अभियानात क्रमांक पटकावण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. तसेच स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून शहराच्या सौंदर्याला लागलेले कचऱ्याचे ग्रहण सोडावे, अशी मागणी पंचवटीकरांकडून केली जात आहे.

"कचऱ्याचा प्रश्न हा काही दिंडोरी व पेठरोडवासियांना काही नवीन नाही आणि तो काही मिटता मिटत नाही. तरीदेखील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिवसभरात किमान दोन वेळा कचरा उचलणे आवश्यक आहे. तसे केल्यास ये-जा करणारे तसेच शहरात येणाऱ्या भक्त भाविकांना देवाच्या पहिले कचऱ्याचे दर्शन होणार नाही,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे."

- हर्षल गांगुर्डे, स्थानिक नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT