Dr Bharti Pawar esakal
नाशिक

Nashik News: नव्या वर्षाचे स्वागत करताना सावध राहा : डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. पण, दुसरीकडे गत काही वर्षांपासून धास्ती असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. सध्या देशात जेएन १ व्हेरियंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरातील राज्यांना व आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Dr Bharti Pawar statement Be careful while welcoming new year nashik news)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी शनिवारी (ता. २३) पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. देशात कोरोनाचा नवा व्हेरियंटचा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र व गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सध्या सुटीचे दिवस असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असल्याने खबरदारीच्या सूचना यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

केरळमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तिथे जास्त प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच जिनोम सिक्वेन्सिंग केले जात असून, चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

२२ जानेवारी २०२३ ला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण केले जात असल्याने देशभरातील लाखो भाविकांची गर्दी राम जन्मभूमीत होणार असल्याने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात असून, सर्वच राज्यांना सतर्क करण्यात आले असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. देशात सध्या दिवसाला २०० ते २५० कोरोना रुग्ण आढळून येत असून, तीन हजार ५०० रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. १६ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT