Dr. Rahul Aher esakal
नाशिक

Nashik News: चांदवडच्या शेतकऱ्यांना 2 वर्षांनी नुकसानभरपाई : डॉ. राहुल आहेर

सकाळ वृत्तसेवा

चांदवड : तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दोन वर्षांनी २०२१ च्या नुकसानीची मदत मिळणार आहे. २०२१ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते.

नुकसानभरपाईसाठी सरकारने सप्टेंबरमध्ये ४१ कोटी ७७ लाख १ हजार ५२० रुपये मंजूर केले आहेत. तालुक्यातील ४८ हजार ७३९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. (Dr Rahul aher statement Compensation to farmers of Chandwad after 2 years Nashik News)

तालुक्यात १ ते ३ डिसेंबर २०२१ दरम्यान कांदा, टोमॅटो, सोयाबीन, मका, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. डॉ. आहेर यांनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

पण नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. डॉ. आहेर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात ही बाब आणून देत डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या नुकसानभरपाईसाठी मदत मंजूर करून घेतली.

शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्यासाठी महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, प्रहार पक्षातर्फे मोर्चा काढ आंदोलन करण्यात आले होते.

अखेर विरोधकांसह शेतकऱ्यांच्या मागणीला दोन वर्षांनी न्याय मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. आता यंदाच्या दुष्काळाची मदत याचवर्षी मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अशी मिळणार मदत (प्रत्येकी २ हेक्टरच्या मर्यादेत)

० जिरायती पिके : ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर

० बागायत पिके : १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर

० बहुवार्षिक पिके : १८ हजार रुपये प्रति हेक्टर

"नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे संवाद साधून आपले आधारकार्डसह केवायसी करून घेणे आवश्यक आहे. तलाठी यांच्याकडील जवळपास ७ हजार ५६१ लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे व बँक खाते ‘अपलोड' केले आहेत. उर्वरित ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडील लाभार्थ्यांचा डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल."

- मंदार कुलकर्णी (तहसीलदार, चांदवड)

"तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाईची रक्कम दोन महिन्यांपूर्वी जमा होऊन अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. दिवाळीपूर्वी मदत मिळाली असती, तर बरे झाले असते. आता लवकर मदत खात्यावर जमा व्हावी."

- अशोक आहेर (शेतकरी, भडाणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT