पंचवटी (जि. नाशिक) : काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले खड्डे व डागडुजी उघडी पडली असून, यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून याकडे काणाडोळा केला जात असून या रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे वाहनधारक व पादचारी मात्र उडणाऱ्या या धुळीमुळे त्रस्त झाले असून, त्यांना श्वसनाचे आजारास सामोरे जावे लागत आहे. (Due to dust drivers suffering and breathing capacity is decreasing Nashik news)
सतत मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची केलेली मलमपट्टी उघडी पडली आहे व मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. रस्ता बुजविण्यासाठी वापरण्यात आलेला मुरूम व माती वर आल्याने यातून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. तसेच पसरलेल्या मुरुमाच्या मातीचे धुळीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे याच रस्त्यावरून मार्गक्रमण करणारा वाहनधारकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
धूळ श्वासावाटे शरीरात जाते. त्यानंतर धुळीचे कण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धुळीचे कण श्वसनातून शरीरात, फुफ्फुसात, श्वसन नलिकेत जातात. ॲलर्जीचा त्रास असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धुळीचे कण दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत जाणे होय.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
"पाऊस थांबल्यानंतर महापालिकेने मुरूम टाकून जे खड्डे बुजविले आहे. त्यातील सर्व मुरूम, माती रस्त्यावर येऊन नागरिकांच्या डोळ्यास व श्वसनास त्रासदायक ठरत आहे. मुळात मनपा प्रशासनाने खड्डे पडणार नाहीत, असे रस्ते करायला हवे. नाहीतर किमान खड्डे बुजविताना पुढे धुळीचा सामना करावा लागणार नाही, अशा स्वरूपात खड्डे बुजवावेत."- विशाल बेंडकुळे, सामाजिक कार्यकर्ता
"ज्यांना धुळीची ऍलर्जी आहे, त्यांना अधिक त्रास होतो. हे धुळीचे कण श्वसन नलिकेत जाऊन फुफ्फुसाना त्रासदायक आहे. यामुळे दमा , श्वसनाचे आजार उद्भवू शकता. यासाठी मास्क, स्कार्पचा वापर केला पाहिजे आणि हेल्मेट वापरावे. जेणेकरून आपणास कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही."- डॉ. अरुण विभांडिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.