Eleven policemen were promoted with three days left for retirement nashik marathi news 
नाशिक

सेवानिवृत्तीच्या ३ दिवस अगोदर मिळाली रखडलेली पदोन्नती! ११ पोलिसांना सन्मानाने पदक बहाल

विनोद बेदरकर

नाशिक : तांत्रिक कारणामुळे पदोन्नती रखडलेल्या शहरातील अकरा पोलिसांना निवृत्तीच्या अवघ्या तीन दिवस अगोदर रखडलेल्या पदोन्नत्यांबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वतः सन्मानाने संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पदक बहाल केले. 

मुंबई नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला नाईक विजय पंडित खैरे या गुरुवारी (ता. ३१) निवृत्त होणार आहेत. सोमवारी (ता. २८) त्यांचा वाढदिवस होता. तांत्रिक कारणामुळे त्यांची निवृत्त रखडली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी ही बाब उपायुक्त अमोल तांबे यांच्या, तर तांबे यांनी पोलिस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. खैरे यांच्यासह इतरही आठ पदोन्नती रखडलेल्या पोलिस नाईक यांची अंमलदार म्हणून आठ जणांना पदोन्नती दिली. पोलिस आयुक्त पांडे यांनी स्वतः सदर पदोन्नतीचे पदक पोलिस आयुक्त कार्यालयात बोलवत प्रदान करत त्यांचा सत्कार केला. 

वाढदिवसाला अनोखं गिफ्ट!

खैरे या विनयनगर परिसरात रहायला असून, त्या एकट्याच राहातात. त्यामुळे त्यांचा पोलिस दलातील अखेरचा वाढदिवस स्वतः पोलिस आयुक्त, उपायुक्तांसह पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येऊन साजरा केला. त्यामुळे भारावलेल्या खैरे म्हणाल्या, की मला वाटलेसुद्धा नव्हते की मी पदोन्नती होऊन निवृत्त होईल. पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पदोन्नती मिळाल्याने सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे कौतुक केले त्यांचे आभार मानते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

Maharashtra Cold : राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT