engine of development needs booster dose of builders expectations nashik news
engine of development needs booster dose of builders expectations nashik news esakal
नाशिक

Nashik News: विकासाच्या इंजिनला हवा बूस्टर डोस; बांधकाम व्यावसायिकांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: संस्कृत शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. ही ओळख टिकून शहरातील वाहतूक, पार्किंगव्यवस्थेला शिस्त लागावी. चांगल्या गोष्टींचे अनुकरण व्हायला हवे. शहरात आयटी पार्क, निओ मेट्रो यांसारख्या वीसहून अधिक प्रकल्पांची घोषणा झालेली आहे.

परंतु त्याचे काम मार्गी लागताना दिसत नाही. केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होऊन शहर विकासाच्या इंजिनला बूस्टर डोस मिळाला, अशी अपेक्षा शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.

‘सकाळ’ सातपूर कार्यालयात सकाळ राउंड टेबल उपक्रमांतर्गत बांधकाम व्यावसायिकांची बैठक शुक्रवारी (ता. १०) घेण्यात आली. क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, सहसचिव अनिल आहेर, सहसचिव हृषिकेश कोते, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापन समिती सदस्य मनोज खिंवसरा, अनंत ठाकरे, सागर शाह, सुशील बागड, व्यवस्थापन समिती सदस्य निरंजन शाह, विजय चव्हाणके आदी उपस्थित होते. (engine of development needs booster dose of builders expectations nashik news)

‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत करताना शहर विकासाची भूमिका मांडली. मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) पंकज पिसोळकर यांनी आभार मानले. नागरिकांनी शहर विकासाबद्दल जागरूक होण्याची आवश्‍यकता आहे. शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

रिंगरोड, उड्डाणपूल नसल्याने वाहतूक कोंडीला नाशिककरांना सामोरे जावे लागत आहे. शहरात उद्याने, मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत. गोदाकाठ, रामतीर्थाच्या जागेचा विकास करून नाशिकची धार्मिक पर्यटनात ओळख व्हावी, ड्रायपोर्ट, कृषी विद्यापीठ, निओ मेट्रो यांसारख्या प्रकल्पांना गती मिळावी, अशा शहर विकासाच्या विविध मुद्द्यांवर बांधकाम व्यावसायिकांनी सकाळ राउंड टेबल बैठकीत सूचना मांडल्या. या बैठकीतील मुद्द्यांचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.

ड्रग्सची राजधानी नको

शहर विकास होत असताना महाविद्यालयीन तरुणाई ड्रग्स घेण्याकडे आकर्षित होत आहे. तरुणाईला ड्रग्सची सवय होऊ पाहत आहे. तरुणी या जाळ्यात ओढल्या जात आहेत. या स्थितीत पालक संभ्रमात आहेत. त्यासाठी पुनर्वसन केंद्र नाशिकमध्ये नाहीत. तज्ज्ञ मार्गदर्शक नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नाशिकमध्ये कितीही नवीन संस्था आल्या तरी ड्रग्समुळे त्याचा उपयोग होणार नाही. ड्रग्सविषयी तरुणाईमध्ये जनजागृती होण्याची आवश्‍यकता आहे. नाशिक ड्रग्सची राजधानी होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना बांधकाम व्यावसायिकांनी बैठकीत केल्या.

वारासणीप्रमाणे व्हावी नाशिकची ओळख

दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा अशी नाशिक शहराची ओळख आहे. गोदाकाठावर अनेक पुरातन मंदिरे काशीची आठवण करून देतात. गत काही वर्षांत वारासणीची धार्मिक पर्यटनासाठी जगात ओळख झाली आहे.

त्या धर्तीवर गोदाकाठ, रामतीर्थाच्या जागेचा विकास करून नाशिकची धार्मिक पर्यटनात ओळख व्हावी. नाशिक शहराचा विकास सिंहस्थापुरता मर्यादित न राहता शाश्‍वत होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे बैठकीत बांधकाम व्यावसायिकांनी नमूद केले.

...या मुद्यांवर ऊहापोह

- शहराचे २०४० पर्यंत विकासाचे व्हिजन ठरावे

- रिंगरोडचा प्रश्‍न मार्गी लागावा

- शहर विकासात लोकसहभाग वाढावा

- मुंबई-नाशिकचा प्रवास सुखकर व्हावा

- विकास सप्ताहापुरता मर्यादित न राहता ब्रॅन्डिंग व्हावे

- दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना द्यावी चालना

- ‘एक शहर, एक अजेंडा’ या माध्यमातून औद्योगिक विकासाला मिळावी गती

- करन्सी प्रेसप्रमाणे केंद्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट याव्यात

- वाराणसी आरती जगभर प्रसिद्ध तशी गोदा आरती व्हावी प्रसिद्ध

- ड्रायपोर्ट, कृषी उद्योग, निओ मेट्रो यांसारख्या प्रकल्पांना गती मिळावी

- कसारा लोकल नाशिक रोडपर्यंत आणावी

- वाहतूक, पार्किंगव्यवस्थेला लागावी शिस्त

- हॉटेलची वेळ वाढविण्यात यावी

"समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, आयटी पार्क, नमामि गोदा प्रकल्प व एकूण नाशिकच्या विकासासाठी निमा प्रयत्नशील आहे. ‘एक शहर, एक अजेंडा’ या माध्यमातून औद्योगिक विकासाला गती मिळावी. मेडिकल ट्युरिझमसारखी यंत्रणा नाशिक जिल्ह्यात यावी. एचएल, करन्सी नोटप्रेस यांसारखी नाशिकची ओळख होईल, असे केंद्रीय स्तरावरील प्रकल्प, कृषी विद्यापीठ नाशिकला आल्यास नाशिकचा शाश्‍वत विकास होण्यास मदत मिळणार आहे. शहरात वॉटर टॅक्सीचा प्रयोग राबविल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. गोदा आरती सुरू झाल्यास छोट्या व्यावसायिकांना चालना मिळणार आहे." -कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो

"नाशिक वाहतूक कोंडीमुक्त शहर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नाशिक विकास मानांकनचा दर्जा टिकावा. शहरात नागरिकांना पार्किंगची समस्या भेडसावते आहे. पार्किंग कुठे करावे, यासाठी नागरिकांची तारांबळ उडते. यावर उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. नाशिकमधील तरुणाई ड्रग्सच्या आहारी गेली आहे. यामुळे पालक संभ्रमात असून, ड्रग्सची सवय लागलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी नाशिकमधील डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा." -गौरव ठक्कर, मानद सचिव

दरडोई उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत नाशिकचा विकास होणे अशक्य आहे. दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शहर विकासाला चालना देण्यासाठी मोठे औद्योगिक प्रकल्प नाशिक शहराला मिळावेत. औद्योगिक प्रकल्प शहरात आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहराची प्रतिमा ‘स्वच्‍छ नाशिक’ अशी उजळावी. शहर विकासात तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. शहर विकास करताना तो शाश्‍वत टिकणारा असेल, असा असावा. स्वच्‍छ नाशिकसाठी नागरिकांनी, तरुणाईने पुढाकार घेण्याची गरज आहे. - नरेंद्र कुलकर्णी, सहसचिव

शहरात निवडणुकीमुळे शहर समस्या उद्‍भवलेल्या आहेत. प्रतिनिधी नसल्याने रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते खोदून ठेवलेले आहेत. बाजारपेठेत सणांना होणाऱ्या गर्दीवर पोलिसांचे नियंत्रण नाही. खड्डे व खोदलेल्या रस्त्यांवर कोणी बोलताना दिसत नाही.-हृषिकेश कोते, सहसचिव

शहर विकासाचे स्वप्न साकार होताना काही कमतरता जाणवतात. कसारा लोकल नाशिक रोडपर्यंत आणल्यास मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. नाशिकमध्ये निओ मेट्रो प्रकल्पाला चालना मिळावी. मुंबईचा प्रवास समृद्धीमुळे सुखकर होईल; परंतु जुन्या नाशिक-मुंबई महामार्गाचा प्रवासही प्रवाशांना सुखकर व्हावा. -अनिल आहेर, सहसचिव

शहरातील अनेक प्रकल्पांना चालना मिळाल्यानंतर अपूर्ण राहतात. नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यासपीठ असताना तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाला चालना देता येईल. नवीन योजना आणताना जुन्या योजना, प्रकल्पांचे पुढे काय झाले ते नागरिकांच्या लक्षात यावे. औद्योगीकरणासाठी नाशिकचे ब्रॅन्डिंग व्हावे. कर, वीजबिल महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत, याचा विचार होणे आवश्‍यक आहे. - विजय चव्हाणके

शहर विकासाकडे पाहत असताना कोणत्याही गोष्टीचा अभ्यास होताना दिसत नाही. शहर विकासात खर्च भरपूर होतो; पण व्यवस्थापन होत नाही. शहरात अनेक कामे दर्जात्मक झाली आहे. निवडणुका होत नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. -मनोज खिंवसरा, सदस्य, व्यवस्थापन समिती

शहर विकास करताना निधी योग्य ठिकाणी वापरात येत नाही. नाशिकशी हवाई कनेक्टिव्हिटी कशी असावी, यावर चर्चा होते. ती मेट्रो सिटींप्रमाणे व्हायलाच हवी; परंतु वंदे भारत, राजधानी एक्स्प्रेसमधील सुविधांविषयी बोलावे, त्यावर चर्चा व्हावी. -सुशील बागड

नाशिक शहरात अनेक प्रकल्पांना चालना मिळते. त्यानंतर ते अपूर्णावस्थेत राहतात. अशा प्रकल्पांची स्थिती नागरिकांना समजावी. शहराचे व्हिजन मिशन २०४० पर्यंत असावे. जागतिक पातळीवर हॅप्पीनेस इंडेक्स मोजला जातो, त्या धर्तीवर नाशिककरांच्या हॅप्पीनेस इंडेक्सवर काम होण्याची आवश्‍यकता आहे. स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात यावे. -निरंजन शाह

शहरातील अनेक उद्यानांचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. शहरातील अनेक वाहतूक बेट सुशोभित करून तोडली जात आहेत. अंडरपासचा उपयोग होतच नाही. तो होण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. शहरातील पार्किंग, वाहतुकीचा प्रश्‍न सुटावा. - अनंत ठाकरे

शहर विकासाला सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे चालना मिळते. औद्योगिक विकास साधताना आयटी हबला प्रोत्साहन मिळणे आवश्‍यक आहे. नाशिकला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे, जयपूर फेस्टिव्हलच्या धर्तीवर मोठा उत्सव शहरात व्हावा. शहरातील वाहतूक, पार्किंगच्या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे. -सागर शाह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT