exam student  Sakal
नाशिक

Student Evaluation Test: मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक जाहीर; खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

Student Evaluation Test : राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे. राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

तसेच त्यासाठी १४ कोटी ६० लाख रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली आहे. त्यानुसार दोन चाचण्या घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Evaluation test schedule announced nashik news)

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने मान्यतेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. सध्या राज्यभरात स्टार्स ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांइतकेच विद्यार्थी खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकतात. अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील जवळपास निम्मे विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहिल्यास संपादणूक पातळीत वाढ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन या दोन चाचण्या आयोजित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

असे आहे संकलित चाचणीचे वेळापत्रक :

तारीख : विषय : इयत्ता

३० ऑक्टोबर : मराठी : तिसरी ते आठवी

३१ ऑक्टोबर : गणित : तिसरी ते आठवी

०१ नोव्हेंबर : इंग्रजी : तिसरी ते आठवी

वेळ :

तिसरी/ चौथीसाठी : ९० मिनिटे

पाचवी/ सहावीसाठी : ९० मिनिटे

सातवी/ आठवीसाठी : १२० मिनिटे

गुण :

तिसरी/ चौथीसाठी : ३० गुण

पाचवी/ सहावीसाठी : ४० गुण

सातवी/ आठवीसाठी : ५० गुण

(वेळापत्रकानुसार मराठी व गणित विषयासाठी सर्व माध्यमांचा समावेश असून, इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळण्यात आल्या आहेत. गुण आणि वेळ सर्व विषयांसाठी समान आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT