grapes.jpg
grapes.jpg 
नाशिक

पोषक वातावरणाने बळावल्या द्राक्ष निर्यातदारांच्या आशा 

संदीप मोगल

लखमापूर (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरीमध्ये सध्या वातावरण द्राक्षपिकांसाठी पोषक तयार झाल्याने द्राक्ष उत्पादक व निर्यातदारांच्या चालू हंगामावरील आशा बळावल्या आहेत. मागील द्राक्ष हंगामात कोरोनाच्या परिस्थितीमुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले होते; परंतु यंदाच्या हंगामात द्राक्षपिकासाठी वातावरण पोषक तयार झाल्याने चालू हंगामात मागील हंगामात गेलेले भांडवल व नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा बळीराजाला वाटू लागली आहे. 

यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्षे निर्यातीचे चित्र

जिल्ह्यातील काही भागांमध्ये हंगामातील द्राक्षे काढणीला सुरवात झाली असून, जागेवर ८० ते ८५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. तसेच निर्यातक्षम द्राक्षांचे भाव त्यापेक्षा अधिक आहेत. मागील हंगामात द्राक्षे बऱ्यापैकी निर्यात करण्यात आली. प्राथमिक अंदाजपत्रकाच्या आधारानुसार निर्यातीची आकडेवारी जवळजवळ एक लाख ९५ हजारांपर्यंत मिळते. सध्याचे वातावरण निर्यातीसाठी पोषक असून, बाहेरील देशात द्राक्षे योग्य वेळेत अथवा कसली अडचण न येता झाल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्षे निर्यातीचे चित्र निर्माण होईल, अशी अपेक्षा शेतकरी व निर्यातदारांना वाटू लागली आहे. 

शेतकरी व निर्यातदारांना अपेक्षा
मागील द्राक्ष हंगामात साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात कोरोनामुळे जागतिक टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे द्राक्ष हंगामाची पूर्णपणे वाट लागली होती. त्यामुळे दिंडोरीच्या द्राक्षपंढरीतील बळीराजा मेटाकुटीला आला होता. अशा खडतर परिस्थितीस शेतकरी वर्गाला तोंड द्यावे लागले. त्यामध्ये एवढा माल शिल्लक राहिला की बेदाणा निर्मितीसाठीसुद्धा कोणी खरेदी करीत नव्हते. परंतु यंदा मात्र द्राक्ष पिकांसाठीचे वातावरण चांगल्या स्वरूपाचे असल्याने यंदा द्राक्षाची निर्यात चांगली होईल, अशी अपेक्षा शेतकरी व निर्यातदारांना वाटू लागली आहे. 

मागील हंगामातील जानेवारी २०२० पर्यंतची द्राक्षे निर्यात आकडेवारी : 
- नेदरलँड : २३८ (कंटेनर) ३ हजार १६० (टन) 
- जर्मनी : ६४ (कंटेनर) ८३० (टन) 
- यूके : ३० (कंटेनर) ३९२ (टन) 
- डेन्मार्क : ६ (कंटेनर) ७४ (टन) 
- फिनलँड : ४ (कंटेनर) ५० (टन) 
- लिथुनिया : ३ (कंटेनर) ४७ (टन) 
- स्पेन : २ (कंटेनर), २४ (टन) 
- फ्रान्स : १ (कंटेनर), १४(टन) 
- इटली : १ (कंटेनर), १३(टन) 
- सोलवेनिया : ७ (कंटेनर), ९३ (टन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT