ाsakal
नाशिक

Eye Infection : नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन! डोळे येण्याचे प्रमाण वाढले; अशी घ्या काळजी..

सकाळ वृत्तसेवा

Eye Infection : संततधारेमुळे डोळे येण्याचा संसर्ग वाढत असल्याने गर्दीत जाणे टाळावे. तसेच स्वतः रुग्णाने वेगळा रुमाल वापरून स्वच्छता बाळगण्याचे आवाहन नेत्रविकार तज्ञांनी केले आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात डोळे आलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कुटुंबातील एखादा सदस्य बाधित झाल्यास संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होत आहे. (eye viral infection precautions nashik news)

त्यामुळे संपूर्ण कुटुंब या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून येते. शाळेतील विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना प्रथमतः याचा संसर्ग होत असल्याचे दिसून येते.

एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते, त्यात तथ्य नाही. एकदा डोळे येऊन गेले की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही, असेही तज्ञांनी म्हटले आहे.

अशी घ्या काळजी

-डोळे आलेल्या व्यक्तीने रुमाल, टिश्यू पेपर, साबण, टॉवेल, उशी अशा वस्तू इतरांनी वापरू नये

- या आजारावर स्वत:च्याच मनाने घरगुती उपाय करू नये

- संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

-डोळे येणे या आजारावर अँटिबायोटिक औषधे आणि डोळ्यांत घालायचे ‘अ‍ॅस्ट्रिंजंट’ प्रकारचे ड्रॉप्स उपलब्ध

-डोळे आलेल्या व्यक्तीने गॉगल वापरावा

-या व्यक्तीला डोळे चोळण्याची इच्छा झाली तरी गॉगलमुळे ते जाणीवपूर्वक टाळणे शक्य

-विद्यार्थ्यांनी गर्दीत किंवा शाळेत जाणे टाळावे

-एकमेकांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक

"डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात येण्याचे टाळावे. स्वच्छता राखावी आणि वारंवार हात धुवावे. आजारी व्यक्तीने स्वतःचा वेगळा रुमाल वापरल्यास इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही ड्रॉप्स घेवू नये." -डॉ. राजश्री कुटे, नेत्रविकार तज्ञ, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT