mobile company.jpg 
नाशिक

"...तर लवकरच कोरोना थर्ड स्टेजला पोहचेल" 'तो' मॅसेज व्हायरल कराल तर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लवकरच कोरोना थर्ड स्टेजला पोहचेल, त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. यासह अन्य विविध सूचना देणारा संदेश सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. नाशिक कलेक्‍टरकडून सूचना या नावाने व्हायरल होत असलेला हा मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा आशयाचा कुठलाही मॅसेज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी केला नसल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिलेला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभुमिवर वेळावेळी शासकीय यंत्रणेकडून सूचना व दिशानिर्देश जारी केले जात असतात. या सुचनांशी निगडीत संदेश काही मिनीटांमध्ये सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने नागरीकांना माहिती मिळत असते. परंतु तंत्रज्ञानाचा गैरफायदा उचलला जात असल्याचीही काही उदाहरणे समोर आलेली आहेत. "नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना' अशा मथळ्याखालील संदेश सध्या व्हायरल होत असून, यात पूर्णपणे चुकीची माहिती पसरविली जाते आहे.

असे आहेत संदेशातील काही मुद्दे

व्हायरल होत असलेल्या संदेशात शुद्ध लेखनाच्या प्रचंड चूका आहेत. तसेच आपण कोरोनाच्या थर्ड स्टेजला असल्याचे सांगत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. चिकन-मटणसह बेकरीचे पदार्थ खाणे बंद करण्याचे आवाहन या बनावट संदेशात केलेले आहे. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुवून घ्या. दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुवा. वृत्तपत्रे बंद करा, नाहीच जमले तर एका ट्रेमध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा असे खोटे व विनोदी मुद्दे या संदेशात नमुद केले आहे.


कायदेशीर कारवाईचा इशारा

या सर्व बाबी खोडून काढतांना जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. "नाशिक कलेक्‍टरकडून सूचना' या मथळ्याखाली व्हायरल होत असलेला संदेश खोटा आहे. जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक वस्तू, सेवा तसेच वृत्तपत्रे बंद व ज्या सेवा सद्यस्थितीत नियम पाळून सुरू आहेत, त्या सेवाही बंद असल्याचे नमूद केलेले आहे. अशा प्रकारचा कोणताही संदेश जिल्हा माहिती कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेला नाही. हा संदेश अफवा पसरविणारा व नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण करणारा असून हा संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच फॉरवर्ड करत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारादेखील दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT