Hirabai Mankar
Hirabai Mankar esakal
नाशिक

Success Story : शेतमजूर हिराबाई बनल्या दुमजली मॉलच्या मालकीण!

विजयकुमार इंगळे

जगण्याच्या वाटचालीत दुःख जणू जन्मतःच घेऊन जन्माला आली... पानटपरीच्या उत्पन्नावर सदस्यांना जगवणाऱ्या कुटुंबात वाढली... कधीतरी परिस्थिती बदलेल, या आशेवर तिची धडपड सुरू होती. मात्र लग्नानंतरही सासरी परिस्थिती जैसे थे... आयुष्यभर कष्टाची सवय झालेल्या माहेरचा प्रवास सासरी शेतमजूर म्हणून सुरू होता.

परिस्थिती बदलण्यासाठी जणू तिनं कंबर कसत कुटुंबाच्या मदतीने गावात किराणा दुकान सुरू करत आर्थिक कोंडी सोडवतानाच सकारात्मक प्रयत्नांच्या जोरावर थेट नाशिक शहरात दुमजली कपड्यांचा प्रशस्त मॉल सुरू करत उद्योजिका बनलेल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील हिराबाई मानकर यांचा प्रवास प्रेरणादायी ठरलाय... (Farm labour Hirabai become owner of two floor mall Nashik Success Story Latest Marathi News)

साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील माहेर असलेल्या हिराबाई काशीनाथ मानकर यांचे सासर मालेगाव तालुक्यातील दाभाडी... शिक्षण दहावी नापास... वडील वंजी भावराव गवळी यांचे पत्नी सुमनबाई, तसेच चार मुली व दोन मुले असं आठ जणांचं कुटुंब होतं. कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना पानटपरी चालवण्यासह देशशिरवाडे गावात सायकल दुरुस्तीचेही काम ते करत होते. वडिलांनी लवकर लग्न ठरवल्याने हिराबाई यांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले, त्यामुळे दहावीत असतानाच त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला.

लग्नानंतर सासरी दाभाडी येथेही पती काशीनाथ मानकर यांचीही परिस्थिती जेमतेम... पती काशीनाथ यांचेही शिक्षण जेमतेमच... सासरे अणाजी मानकर यांनी वखार सुरू केली होती. मात्र कुटुंबातील सदस्यांची संख्या पाहता रोजचा दिनक्रम पुढे नेणे अशक्य असल्याने पती काशीनाथ हे मालेगाव येथे पावर लूमवर हंगामी कामगार म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करीत होते. अशा परिस्थितीत हिराबाई यांच्यावरही कष्टाची जबाबदारी पडली. सासूबाईंसह त्याही शेतमजूर म्हणून गावात कामाला जात होत्या.

जिद्दीला प्रोत्साहन दिले

शेतमजुरी करत आयुष्य निघणे अशक्य असल्याने स्वतः काहीतरी करावे, अशी मनाशी इच्छा बाळगून असलेल्या हिराबाई यांनी पती मानकर यांना गावात किराणा दुकान सुरू करण्याबाबत कल्पना बोलून दाखवली. काशीनाथ यांनी कुटुंबाकडे जमा असलेले सात हजार रुपये आणि मित्रांकडून हातउसनवार आठ हजार रुपये घेऊन १९९८ मध्ये गावात किराणा दुकान टाकले. येथूनच खऱ्या अर्थाने कुटुंबाला यशाचा राजमार्ग सापडला. याच काळात कुटुंबात मुलगा सागर, नीलिमा, तसेच आशिष या मुलांच्या निमित्ताने सदस्यसंख्याही वाढली होती.

किराणा दुकान ते मॉलचा थक्क करणारा प्रवास...

मोठा मुलगा सागर याच्या निमित्ताने कुटुंबाने व्यवसायाकडे असलेला कल बघत थेट नाशिक गाठले. सागरला नाशिक येथे एका मसाले तयार करण्याच्या कंपनीत हंगामी नोकरी मिळाली. या कंपनीत काम करत असतानाच व्यवसायानिमित्ताने मार्केटिंग शिकला होता. हिराबाई यांनी नाशिकच्या सातपूर परिसरात कपड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. यानिमित्ताने मुलाला व्यवसायात उभे करतानाच कुटुंबासाठी घेतलेला धाडसी निर्णय पथ्यावर पडला.

पती काशीनाथ यांना गावी किराणा दुकानाची जबाबदारी देत त्यांनी नाशिक गाठत मुलांसोबत अशोकनगर येथे कपड्यांच्या शोरूममध्ये स्वतःला झोकून दिले.अशोकनगर परिसरात सुरू केलेल्या कपड्यांच्या शोरूमने थेट नाशिकच्या मोतीवाला कॉलेजजवळ राधिका एनएक्स या दुमजली भव्य कपड्यांच्या मॉलपर्यंत हिराबाई मानकर यांच्या प्रगतीचा आलेख वाढवणारा आहे.

हिराबाई यांनी राधिका मॉलच्या निमित्ताने १३ कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलाय. आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांत आई- वडील, पती काशीनाथ, ज्ञानेश्वर नहिरे, बेबीताई निकम यांनी दिलेल्या आधारावरच इथपर्यंतचा प्रवास सुखकर झाल्याचे सांगताना त्यांचे डोळे पुन्हा पाणावले. मुले सागर, आशीष, मुलगी नीलिमा, जावई नीलेश सावळे, सुना मनीषा, तृप्ती यांचीही हिराबाई यांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मदत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT