Onion Price esakal
नाशिक

Onion Rate : लाल कांदा बाजारभाव सरासरी हजाराच्या खाली!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : बाजार समितीच्या मुख्य व अंदरसूल उपबाजार आवारावर गत सप्ताहात लाल कांदा आवकेत वाढ झाली तर बाजारभावात घसरण झाली.

बाजारभाव सरासरी हजारांच्या खाली आल्याने शेतकरी (Farmer) संताप व्यक्त करत आहेत. (Farmers angry as market price fell below the average of thousands of red onion nashik news)

सप्ताहात येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर एकुण कांदा आवक १ लाख ७८१० क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान २०० रुपये, कमाल १३०० रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. अंदरसुल उपबाजार आवारावर कांद्याची एकुण आवक ६८ हजार २५० क्विंटल झाली असुन लाल कांद्याचे बाजारभाव किमान २०० रुपये, कमाल ११७६ रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. 

सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले सप्ताहात गव्हाची एकुण आवक १३० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान २२०० रुपये, कमाल ३०२६ रुपये तर सरासरी २५७० रुपये पर्यंत होते.

सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात बाजरीची एकुण आवक १४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान २ हजार रुपये, कमाल २८०० रुपये तर सरासरी २०९१ रुपये पर्यंत होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सप्ताहात हरभ-याच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरब-यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसााारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभ-याची एकुण आवक १७२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३५०० रुपये , कमाल ६०९० रुपये तर सरासरी ४७०१ रुपये पर्यंत होते. तुरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले.

सप्ताहात तुरीची एकुण आवक ३७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ५ हजार रुपये, कमाल ६५९० रुपये तर सरासरी ६४०० रुपये पर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात घसरण झाली सोयाबीनची एकुण आवक ११४  क्विंटक झाली असुन बाजारभाव किमान ४३०० रुपये .

कमाल ५१९० रुपये तर सरासरी ५१०० रुपये पर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात मक्याची एकुण आवक ८ हजार १३६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान २०४१ रुपये, कमाल २१५२ रुपये तर सरासरी २१२० रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT