Farmers
Farmers 
नाशिक

इंधन दरवाढीमुळे यंत्राद्वारे शेती अडचणीत

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : शेतीची विविध कामे करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळीराजा शेतीतील मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मात्र, सध्या इतर इंधनासह डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारेही शेती करणे कठीण जात आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड करीत आहेत. दरम्यान, काही मोजके शेतकरी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत आहेत. (farmers-in-crisis-due-to-fuel-price-hike-in-Nashik)



काही वर्षापासून सालगड्याच्या मजुरीत वाढ झाल्याने बळीराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यातच दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने बळीराजाचे शेतीचे गणित एकदमच बिघडत चालले आहे. त्यातच मजुरांचे वाढते दर उत्पादन कमी व खर्च मात्र, अधिक अशा दुहेरी संकटात शेती सापडली आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे प्रत्येक नागरिक दहशतीत आहे. असे असले तरी शेती व्यवसायाने काही प्रमाणात तारले असून आजही कोरोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून राहावे लागत असून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

असे आहेत कामाचे व इंधनाचे दर

  • डिझेल - १०३ रुपये प्रतिलिटर

  • नांगरणी- ७०० रुपये

  • मजुरी- ३०० रुपये

  • निंदणी- २५० रुपये

  • सोंगणी- ३५० रुपये

    बैलजोडीच्या मदतीने शेती करावी तर एका जोडीची किंमत लाखाच्या घरात आहे. यंत्राद्वारे शेती करावी तर इंधनांचे दर, मजुरी, तसेच महागडी जंतूनाशक औषधे, खते आदींच्या किमती शेतीला परवडण्यासारखे नाही. यामुळे तसेच पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होते. शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, शेती करणे कठीण होत चालले आहे.
    - नामदेव यंदे, शेतकरी, नांदूरवैद्य.

    (farmers-in-crisis-due-to-fuel-price-hike-in-Nashik)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT