Kharif Season preparation
Kharif Season preparation esakal
नाशिक

नाशिक : खरीप हंगामासाठी 17 हजार हेक्टरवर पेरणी

संदीप मोगल

लखमापूर (जि. नाशिक) : हवामान विभागाने (Weather Department) चांगल्या पावसाची शक्यता वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांनी पावसाळी पिके (Rainy Season Crops) पेरणीची तयारी पूर्ण केली असली तरी या वर्षी सोयाबीनचा (Soyabean) पेरा वाढण्याची शक्यता जास्त असली तरी टोमॅटोच्या लागवडीची तयारीसुद्धा पूर्ण झाली आहे. (farmers Sowing on 17000 hectares for kharif season Nashik Agriculture News)

शासकीय आकडेवारीनुसार या वर्षी १७ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावर खरिपांची पेरणी अपेक्षित असून, त्यासाठी ११ हजार २८३ क्विंटल बियाणे लागणार आहे. तर खरीप हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी कृषी विभागाने २४ हजार ४३४ टन खतांची मागणी नोंदविली असून टप्प्याटप्प्याने खतांचा पुरवठा सुरू होणार आहे. सध्या डिझेलचे भाव वाढले असले तरी ट्रॅक्टरने होणाऱ्या मशागतीबरोबरच पारंपरिक मशागतीलाही वेग आला आहे. परिसरात पूर्वहंगामी टोमॅटो लागवडीसाठी लागणाऱ्या साहित्य जमवाजमवीबरोबरच रोपांच्या बुकिंगची कामेही काही प्रमाणात सुरू आहेत.

द्राक्ष पिकाची सबकेन व बगलफूट काढण्याची कामे सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे कृषी निविष्टांचे दर वाढण्याने आर्थिक संकट वाढत आहे. मक्याची ९१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असून, त्यासाठी १३७-८० क्विंटल बियांण्याचा पुरवठा लागेल. बाजरी व मका बियाणे बदलावे लागत नसल्याने ते कमी प्रमाणात लागणार आहे. तालुक्यात दिवसेंदिवस तुरीचे क्षेत्र घटत आहे. तरीही शेतकरी वर्ग यंदाच्या खरीप हंगामात तूर घेण्यास उत्सुक आहे. त्यासाठी कृषी विभागाने ३१.५० क्विंटल बियांण्याचा पेरणीसाठी अंदाज बांधला आहे.

यंदा मूगही पेरणीसाठी सज्ज असून, त्यासाठी संबंधित विभागाने १८.४५ क्विंटलची मागणी नोंदविली आहे. उडीदाची मागील स्थिती पाहता ९०५.०० एवढे हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी असून, त्यासाठी १३५.४५ क्विंटल बियांणाची मागणी आहे. भुईमूगची चार हंगामात चांगली स्थिती निर्माण झाल्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी ३३८४.०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी अधिग्रहित असून, त्यासाठी ५०७६.०० क्विंटल बियांणाची मागणी नोंदवली आहे.

तालुक्यातील शेतकरी वर्ग दरवर्षी सोयाबीन पिकांकडे मोठा कल देतात यंदाही सोयाबीन पिकांसाठी ५४३२.०० एवढे हेक्टर क्षेत्र पेरणी साठी उपलब्ध आहेत. त्यात पेरणी साठी संबंधित विभागाने ४०७४.०० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.

पाऊस लवकर सुरू होणार असल्याने शेतकरी मशागत कामांमध्ये व्यस्त आहे. खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाने खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी केली आहे. त्यात यूरिया १४५०, डीएपी २५५०, एमओपी ६०२, एसएसपी २८३२, एनपीके ८००० आदी खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यांची काळजी

खरीप हंगामात खते, औषधे, बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच खत टंचाईचा सामना करावा लागु नये, यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.तसेच त्याबाबतच्या सुचना संबंधितानां देण्यात आल्या आहेत. मात्र खतांची टंचाई अथवा ज्यादा पैसे घेत जात असेल किंवा बनावट बियाणे, खते विक्री करतांना दिसल्यास त्वरित कृषी विभागाची संपर्क करावा. संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे दिंडोरी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT