Yellowing tomato leaves due to cloudy weather. esakal
नाशिक

Nashik Agriculture News: पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; रब्बीतील पिकेही धोक्यात!

सकाळ वृत्तसेवा

खेडभैरव (जि. नाशिक) : आठवड्यापासून इगतपुरी तालुक्यात बहुतांश ढगाळ हवामान, धुके, कमी-अधिक थंडीमुळे त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात सतत ढगाळ वातावरण असून अशा हवामानामुळे पिकांची वाढ खुंटून रोगांचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. आधीच अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या हंगामात प्रचंड नुकसान झाले. आता रब्बीतील पिकेही धोक्यात आली आहेत. (Farmers struggle to save crops Rabi crops also in danger Nashik Agriculture News)

इगतपुरी तालुक्यासह खेड, टाकेद, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणगाव, धामणी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी, सोनोशी, वासाळी आदी परिसरात अवकाळीमुळे खरिपातील भाताचे नुकसान झाले होते. खरिपानंतर रब्बीतील गहू, हरभरा, वाल, मसूर, टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी लागवड सुरू आहे.

या वर्षी रब्बसाठी पेरणीला उशीर झाला होता. यातच पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर करपा, अळी तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. बागायती पिकांवर कीड लागणे, नागअळी पडणे यामुळे शेतकऱ्यांना महागड्या औषधांचा वापर करावा लागत आहे.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. तसेच उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांवरही याचा परिणाम होत असून उत्पादनात घट झाली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

"खरीप हंगामातील भात पिकाचे यंदा अवकाळी पावसाने पूर्णतः नुकसान झाले. सध्या ढगाळ वातावणामुळे पिकांवर विविध रोग धावू लागले आहेत. बागायती पिकांच्या उत्पादनापेक्षा पीक वाचविण्याचाच खर्च जास्त होत आहे." - बाळासाहेब वाजे, शेतकरी, खेडभैरव

"दोन-तीन वर्षांपासून विविध कारणांनी शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आहे. कर्ज, उधार, उसनवार करून पीक वाचविण्याचा खर्च करत आहेत. निसर्गानेच शेतकऱ्यांची साथ सोडल्याने आता करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे."

- सोमनाथ बऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते, अधरवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: इशान किशनची बॅट तळपली, ठोकलं पहिलं शतक; कर्णधार सूर्याचीही फिफ्टी; भारताच्या २७० धावा पार...

Pune Traffic: पुण्यातील ७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर गतिरोधक बसवणार; वाहतुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update: सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! - रोहित पवार

Crime: धक्कादायक! आठवीतील मुलगी गर्भवती राहिली; वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहितीच नाही, नंतर... जे घडलं त्यानं सगळेच हादरले

IND vs NZ, 5th T20I: संजू सॅमसनने शेवटची संधीही गमावली, घरच्या मैदानातही स्वस्तात आऊट

SCROLL FOR NEXT