block road
block road esakal
नाशिक

MSEDCL : राजपूर पांडे फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; गलथान कारभाराविरोधात रोष

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : वीज महावितरण (MSEDCL) कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत औरंगाबाद - अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास अचानक रास्ता रोको आंदोलन केले. (Farmers suddenly blocked road for about one and half hours against bad work of msedcl nashik news)

शेतकऱ्यांनी अचानक छेडलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले दरम्यान शेतकऱ्यांनी सोमवार (ता.१३) पर्यंत जीर्ण वीजवाहक तारांची दुरूस्तीसह सुरळीत वीज पुरवठ्याबाबत वीज महावितरण कंपनीला अल्टिमेट दिला आहे.

द्याने (ता. बागलाण) येथील शेतीशिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वीज महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

ऊस उत्पादक शेतकरी सुरेखा भरत कापडणीस (गट क्रमांक १६०) व गौरव भरत कापडणीस (गट क्रमांक १६२) यांच्या दहा एकरातील उसाच्या शेतात जीर्ण झालेली उच्च दाबाची वीज वाहक तारा तुटून पडल्याने उसाच्या शेतातील चार एकर ऊस जळून खाक झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मागील आठवड्यात रोहित्रावरील उच्च दाबाची जीर्ण झालेली तारा तुटली होती यावेळी कांदा पिकांना पाणी देत असताना शेतकरी महेंद्र धर्मा कापडणीस हे बालंबाल बचावले. वीज वितरण कंपनीला वारंवार जीर्ण वीजवाहक तारांसाठी माहिती देऊनही डोळेझाक होत असल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहेत.

वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ऊस जळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन थेट औरंगाबाद-अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर आंदोलन छेडत संताप व्यक्त केला होता. दरम्यान जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधीसह फौजफाटा तत्काळ दाखल झाला.

वीज महावितरण कंपनीचे अधिकारी आंदोलनस्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र एकही अधिकारी आंदोलन स्थळी आला नाही. श्रीकृष्ण पारधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले. सोमवार (ता.१३) पर्यंत जीर्ण वीजवाहक तारा बदलण्याठी वीज महावितरणला अल्टिमेट दिला

मधुकर कापडणीस, तुषार कापडणीस, शैलेंद्र कापडणीस, सतीश कापडणीस, श्रीकृष्ण कापडणीस, सुपनराव कापडणीस, निंबा कापडणीस, शांताराम कापडणीस, नानाजी कापडणीस, सचिन कापडणीस, दिलीप कापडणीस, राहुल कापडणीस, महेंद्र कापडणीस, दयाराम कापडणीस, मंगेश कापडणीस, गोपाळ कापडणीस , गणेश कापडणीस, सचिन नामदेव कापडणीस, दिनेश कापडणीस, संदीप कापडणीस आदि सहभागी होते.

वायरमन हुकूमशाही

परिसरात धोकादायक ठरत असलेले वीजेचे खांब तसेच जीर्ण वीजवाहक तारा कधी कोसळून अपघात होईल याची कल्पनाच करता येत नाही. यामुळे सदर वायरमनला दुरुस्तीसह सुरळीत वीज पुरवठ्याबाबत विचारणा केल्यास अरेरावीची भाषा करतात. आंदोलनावेळी संबंधित वायरमनला यामुळेच शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान वायरमन कधीही वर्दीत दिसत नसल्याने त्याला वरदहस्त कुणाचा? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT