old woman meet.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक! बायकोचे वर्षश्राध्द घातल्यानंतर 'तीच' बायको पंधरा वर्षांनतर नवऱ्याला भेटते तेव्हा..!

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इंदिरानगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोकनवाडी हे छोटे गाव ..कुटुंबियांपासुन पंधरा वर्षांपूर्वी दुरावलेली भीमाबाई जाधव (वय.60) ही वृद्धा, शोध घेऊन देखील न सापडल्याने आणि एक दिवस त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अशी बातमी मिळाल्याने पती खंडू जाधव आणि नातलगांनी त्यांचे दशक्रिया, वर्षश्राद्ध आदी सोपस्कार देखील पूर्ण करून घेतले. पण त्यानंतर जे काही घडले ते चमत्कारिक होते.

काय घडला चमत्कार...

कुटुंबियांपासुन पंधरा वर्षांपूर्वी दुरावलेली भीमाबाई जाधव (वय.60) ही वृद्धा, शोध घेऊन देखील न सापडल्याने आणि एक दिवस त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अशी बातमी मिळाल्याने पती खंडू जाधव आणि नातलगांनी त्यांचे दशक्रिया, वर्षश्राद्ध आदी सोपस्कार देखील पूर्ण करून घेतले. याच भीमाबाई ना पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने नाशिक जवळ असलेल्या गौळाने शिवारात मंजूरी करणारे पती खंडू जाधव यांच्याकडे पोचवण्यात आले .पंधरा वर्षानंतर एकमेकांना बघितल्यानंतर या वृद्ध दांपत्याची झालेली अवस्था बघून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते .

सर्वतीर्थ टाकेद येथे येवून भिक मागत होती

पती, दोन मुले आणि नातलगांपासुन दुरावलेली व गांवोगाव भटकून मिळेल तिथे भाजी भाकरी खाऊन दिवस काढनारी ही महिला सहा महिन्यांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे येवून भिक मागत होती. तिचे बोलने नीट उमजत नसल्याने कुणी तिची चौकशी देखील करत नव्हते. तेथुन ती भटकत भटकत सटाना येथे पोचली. त्या ठिकाणी पत्रकार संजय खैरनार , महिला बाल विकास विभागाचे सदस्य श्याम बगडाने, रमेश भामरे ,कल्पेश निकम, यांनी तिची विचारपूस करून सर्व व्यवस्था लावली. तीचे नाव,गाव विचारुन घेतले. सर्वतीर्थ टाकेद आणि कोकणवाडी ही नावे समजताच खैरनार यांनी घोटी खुर्द येथील पोलिस पाटील कैलास फोकने तसेच पत्रकार वैभव तुपे यांना कळवले .त्यांनी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विक्रम पासलकर यांना चौकशी करायला सांगितले .

सर्वांनाच धक्का

पासलकर यानी संगमनेर व अकोले तालुक्यातील काही ओळखीच्या पत्रकार कडून कोकणवाडी च्या सरपंच यांच्याकडे चौकशी केली असता त्या काही महिन्यांपूर्वीच एका अपघातात ठार झाल्या असुन त्यांच श्राद्ध देखील झाल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र त्या सुखरूप आहेत हे कळल्यावर सरपंच देखील सुखावले आणि त्यांनी भिमाबाईचे पती खंडू जाधव यांचा संपर्क नंबर देवून ते नाशिक जवळ असलेल्या पाथर्डी शिवारात मोलमजूरी करतात तसेच त्यांनी दूसरे लग्न देखील केले असल्याची माहिती दिली.

आनंदाश्रुच्या साक्षीने दोघे भेटले
सटाणा पोलिसांच्या मदतीने मग संचारबंदित देखील गुरूवार (ता.16) ला भीमाबाई यांना रुग्णवाहिकेतून सोबत घेवून नाशिक गाठले. सिडकोचे सामाजिक कार्यकर्ते गणेश जायभावे यांच्या मार्फत इंदिरानगर शिवसेना विभागप्रमुख निलेश साळुंखे यांना दूरध्वनी करत मदत करण्यास सांगितले. साळुंखे हे सर्वाना सोबत घेवून इंदिरानगर चे पोलिस कर्मचारी गवळी, छगन सोनवणे ,शिवसैनिक संदेश एकमोडे यांच्यासह गौळणे रोडवर वीटभट्टी च्या जवळ किर्लोस्कर फार्म हाऊस येथे खंडू जाधव यांना शोधून काढले.पत्नी ला समोर बघताच दोघेही निशब्द झाले आणि मग डोळ्यांमधील वाहणाऱ्या आनंदाश्रुच्या साक्षीने दोघे भेटले.हे बघून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. - नीलेश सांळूखे (शिवसेना विभागप्रमुख)

माणसांची भेट घडवून देतांना मोठे समाधान

कोरोना व्हायरस सारख्या जीवघेण्या परिस्थितित देखील पोलीस , पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते आपली भूमिका अगदी नेटाने निभावत आहेत.सोबत आपले सामाजिक दायित्व देखील पार पाडत आहेत.याच भावणेतून पंधरा वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्या एका वृद्ध महिलेला आपल्या माणसांची भेट घडवून देतांना मोठे समाधान मिळाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT