Chief Engineer of Power Distribution Company Deepak Kumthekar and other engineers present with Janamitra on the occasion of Lineman's Day esakal
नाशिक

Lineman's Day : जनमित्रांसाठी देशात प्रथमच लाईनमन दिवस! सात्तत्यपूर्ण सेवेबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महावितरणच्या सर्व ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले जनमित्र महावितरण आणि ग्राहक यामधील थेट दुवा असून, शनिवारी (ता. ४) देशात प्रथमच लाईनमन दिवस साजरा झाला.

त्यानिमित्त नाशिक रोडला वीज भवनात वीज वितरण कंपनीच्या जनमित्र कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. (First Linemans Day in country Appreciation of employees for consistent service Mahavitaran nashik news)

केंद्र शासनाने ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून महावितरणसह देशभरात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक शहर विभाग १ व २ मधील तंत्रज्ञांचा पहिला लाईनमन दिवस साजरा झाला.

त्यात, मुख्य अभियंता श्री. कुमठेकर यांच्या हस्ते जनमित्रांचा गौरव करण्यात आला. कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले आणि जनसंपर्क अधिकारी विकास आढे व्यासपीठावर होते.

श्री. कुमठेकर म्हणाले की, जनमित्रांनी ग्राहकांना सेवा देताना शिस्तबद्ध व नियोजनबद्ध राहून महावितरणबाबत निष्ठा जपली पाहिजे. प्रामाणिक ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी प्रकाशदूत म्हणून समाजामध्ये आपल्या कार्याने हे स्थान मिळविले आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

श्री. डोंगरे यांनीही मार्गदर्शन केले. तंत्रज्ञ रवी गोडांबे निर्मित वीजबील वसुली, ग्राहकसेवा यासंदर्भातील चित्रफितीचे या वेळी सादरीकरण झाले. प्रातिनिधिक स्वरूपात तंत्रज्ञ महेश कदम, बाळासाहेब गोसावी, मासूबाबू माळी, राजेंद्र जाधव, जीवनानी, पाटील व चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

व्यवस्थापक मंगेश गाढे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. श्री. आढे यांनी प्रास्ताविक केले. श्री. राजेभोसले यांनी लाईनमन दिवसाची शपथ दिली. कोरोना काळात ग्राहकसेवा देतांना, तसेच अपघातांत निधन झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT