police flower.jpg
police flower.jpg 
नाशिक

VIDEO : "तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित!" खाकी वर्दीप्रती कृतज्ञता..आभार..अन् पुष्पवर्षाव!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केलेली आहे. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर निघू नये असं आवाहन प्रशासनानने केलं आहे. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांपैकीच एक म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा..  केवळ नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी..हे पोलीस बांधव स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमावर अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच पंचवटी परिसरात नागरिकांकडून पोलिस संचलनावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पोलिसांप्रती कृतज्ञता

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, यासाठी पोलीसांकडून हे संचालन करण्यात आले. यावेळी चौकाचौकांमध्ये पोलिसांचे स्वागत झाले. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी नाशिक पोलिसांनी संचलन करत कोरोना विषयी खबरदारी च्या सूचना केल्या,यावेळी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा दिल्या.गुलाबाच्या फुलांनी व टाळ्या वाजवत पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पोलीस दिवसरात्र तैनात

"सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलीस प्रशासनाचे ब्रीदवाक्य आहे.सदरक्षणाय म्हणजे सज्जनांचे व चांगल्या गोष्टीचे रक्षण करणे तर खलनिग्रहणाय म्हणजे दुष्ट व वाईट गोष्टींचा नायनाट करणे होय. आणि त्याच ब्रीदवाक्यानुसार पोलीस कर्तव्य निभावताना दिसत आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य नागरिक जीवनावश्यक आणि गरजेच्या वस्तू तसंच औषधींपासून वंचित राहू नये म्हणून अनेक ठिकाणी पोलीसयंत्रणा कार्य करीत आहे. तर प्रत्येक पोलीस ठाण्यात हेल्पलाइनच्या धर्तीवर हेल्पलाइन कार्यरत आहेत. तसेच कोरोनामुळे चौकाचौकात पोलीस दिवसरात्र तैनात आहेत. ते केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच! याला अनुसरून सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. तसेच, स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचंही यात योगदान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT