education Medical admission
education Medical admission  esakal
नाशिक

Medical Admisssion : वैद्यकीयच्या नोंदणीसाठी या तारखेपर्यंत वाढीव मुदत

सकाळ वृत्तसेवा

Medical Admisssion : ‘नीट’ परीक्षेच्‍या आधारे वैद्यकीय विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना सोमवार (ता. ३१)पर्यंत संकेतस्‍थळावर नोंदणी करून पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल. (For registration of medical Extended until 31 july nashik news)

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यावर दीर्घ कालावधीपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नव्‍हती. काही दिवसांपूर्वीच नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. त्‍यातच नोंदणीची मुदत संपत असताना ही मुदत वाढविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सोमवारी दुपारी बारापर्यंत मुदत असेल. याच दिवशी दुपारी दोनपर्यंत निर्धारित शुल्‍क ऑनलाइन माध्यमातून अदा करता येईल. सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची स्‍कॅन कॉपी अपलोड करायची आहे.

एमबीबीएस, बीडीएससाठी ४ ऑगस्‍टला पहिली निवड यादी

प्रवेशप्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात १ ऑगस्‍टला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांना त्‍यांचे प्राधान्‍यक्रम नोंदविण्यासाठी १ ते ३ ऑगस्‍ट अशी मुदत असेल. पहिल्‍या फेरीसाठीची निवड यादी ४ ऑगस्‍टला जाहीर केली जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ५ ते ९ ऑगस्‍ट अशी मुदत असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आयुष अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचे वेळापत्रक असे

आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी ४ ते ९ ऑगस्‍टदरम्‍यान मुदत दिली जाणार आहे; तर निर्धारित शुल्‍क भरण्यासाठी १० ऑगस्‍टपर्यंत संधी असेल.

११ ऑगस्‍टपर्यंत सर्व कागदपत्रांची स्‍कॅन कॉपी विद्यार्थ्यांनी अपलोड करायची आहे. या अभ्यासक्रमांकरिता प्रारूप गुणवत्ता यादी १३ ऑगस्‍टला जाहीर केली जाईल. यानंतर प्रवेश फेऱ्यांचे सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT