For UPSC Mains Exam Preparation 1.5 crore from Mahajati to 298 students nashik news sakal
नाशिक

UPSC Exam : यूपीएससी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 298 विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’कडून दीड कोटी

सकाळ वृत्तसेवा

UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) पूर्व परीक्षेचा निकाल १२ जूनला जाहीर झाला.

‘महाज्योती’मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी ५० हजार अर्थसहाय्य करण्यासाठी ८ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. (For UPSC Mains Exam Preparation 1.5 crore from Mahajati to 298 students nashik news)

या लाभासाठी एकूण ३५६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी योजनेचा लाभ घेण्यास ३१४ विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ३१४ विद्यार्थ्यांपैकी २९८ विद्यार्थ्यांना रुपये ५० हजार त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले. ‘महाज्योती’ने आतापर्यंत एक कोटी ४९ लाख इतक्या निधीचे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांच्या खात्यावर वितरित केले आहे.

उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर निधी वितरित केला जाणार असल्याचे ‘महाज्योती’चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शिरसाठे यांनी कळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरमार्फत २०२३ या वर्षासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (नागरी सेवा) पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र २९८ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रत्येकी रुपये ५० हजार याप्रमाणे एक कोटी ४९ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. ‘महाज्योती’चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

IPL 2026 Auction live : CSK ने स्वतःच्याच खेळाडूला 'परकं' केलं! MS DHONI चा विश्वासू गोलंदाज १८ कोटींत KKR च्या ताफ्यात

Credit Card : या सोप्या सवयी लक्षात ठेवल्या, तर क्रेडिट कार्ड देईल तुम्हाला मोठा फायदा! फायदा हवा? हे एकदा नक्की पाहा!

SCROLL FOR NEXT