Gram Panchayat Election
Gram Panchayat Election esakal
नाशिक

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांच्या खर्चाचा विसर; मुदत संपूनही पुढाऱ्यांचा प्रतिसाद नाही

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींच्या १८ डिसेंबरला सार्वत्रिक निवडणुका झाल्या. निवडणूक लढलेल्या चार हजार ७२ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी १९ जानेवारी शेवटची मुदत होती. मात्र मुदत संपून महिना उलटूनही जिल्हा यंत्रणेकडे माहिती आलेली नाही. (Forget cost of Gram Panchayat elections no response from leaders even after deadline nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

जिल्ह्यात १४ तालुक्यांतील इगतपुरी-२, कळवण-१६, चांदवड-३५, त्र्यंबकेश्वर-१, दिंडोरी-६, देवळा-१३, नांदगाव-१५, नाशिक-१४, निफाड-२०, पेठ- १, बागलाण-४१, येवला-७, सिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा समावेश होता.

यात चार हजार ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी तीन हजार ४७६ उमेदवार सदस्य पदासाठी, तर ५९७ उमेदवार सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात होते. १८ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला लागल्यानंतर ३० दिवसांत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य होते;

परंतु अनेक उमेदवारांनी तो सादर केला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे १९ जानेवारीच्या आत खर्च सादर न करणारे उमेदवार भविष्यात निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले जातील, असा इशारा उपजिल्हाधिकारी (पूनर्वसन) नितीन गावंडे यांनी दिला होता. त्यामुळे मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT