arrested esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावला शालेय फीची रक्कम चोरणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात घरफोडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. चोरट्यांनी येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची जमा झालेली शालेय फी मुख्याध्यापकांच्या दालनातील कपाटातून चोरून लंपास केली. पोलिसांनी आठवड्यात चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून नऊ लाख रुपये जप्त केले आहेत. (Four who stole school fee money in Malegaon arrested by police Nashik Crime News)

येथील हारून अन्सारी उर्दू प्रायमरी स्कूलमधील जे. ए. टी. कॅम्पस येथील मुख्याध्यापिका यांच्या कार्यालयातील कपाटात मुलांची शैक्षणिक व परीक्षा फी, अशी १५ लाख ९९ हजार ५०० रुपये रोख रक्कम होती.

संबंधित रक्कम चोरट्यांनी २८ डिसेंबरला पळविली. चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीमुळे येथे खळबळ उडाली होती.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शहर पोलिस उपअधीक्षक तेगबिरसिह संधू यांच्या विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीद्वारे सापळा रचला.

चोरटे येथील मनमाड चौफुली उड्डाणपुलाखाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यात मोहम्मद सुलेमान मोहम्मद सलीम ऊर्फ माने (वय २३), मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद ऊर्फ बिल्ला (२२, दोघे रा. इस्लामपुरा), मोहम्मद आमीन निसार अहमद ऊर्फ ताडे (२२, रा. मोमीनपुरा), अफताब अहमद अब्दुल अजीज ऊर्फ ग्याराबार (२४, रा. कमालपुरा) या चौघांकडून नऊ लाख १४ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

चौघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कारवाईत प्रीती सावजी, सुनील दांडगे, इमरान सय्यद, दिनेश शेरावते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT