Papad
Papad  Esakal
नाशिक

Nashik News : महाराष्ट्रातील 62 रेल्वे स्थानकांवर मसाल्यापासून पापड विक्री केंद्र सुरु

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय ‘वोकल फॉर लोकल' याला चालना देण्यासह स्थानिक-स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि वंचित घटकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे यासाठी ‘एक स्थानक-एक उत्पादन' ही योजना २५ मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली. (From species to Papad sales center at 62 railway stations in Maharashtra nashik news)

१ मेपासून २१ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशातील ७२८ रेल्वे स्थानकातील ७८५ विक्री केंद्रे सुरु करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ६२ रेल्वे केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांमधील विक्री केंद्रात घरगुती मसाले, चिक्की, भडंग, शेंगलाडू, लोणचे, पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणचे यांसारखी हंगामी फळे आणि खाद्यपदार्थ, पापड याचा समावेश आहे.

ही केंद्र असलेली महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके अशी : नगर, आकुर्डी, अमरावती, अमरावती (एएमआय), औरंगाबाद, बडनेरा, बलहारशाह, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, भंडारा रोड, बोरिवली, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचवड, चर्चगेट,

दादर (डीडीआर आणि डीआर), दोंडाईचा, गंगाखेर, घाटकोपर, गोंदिया, हिंगोली, इगतपुरी, इटवारी, जालना, कलबुर्गी, कल्याण, कर्जत, किवत, कोल्हापूर, कुर्ला, लातूर, लोणावळा, मनमाड, मिरज, मुलुंड, मुंबई सेंट्रल, नगरसूल, नागपूर, नाहूर, नांदेड, नाशिक रोड, पालघर, पंढरपूर, परभणी, परळ, पिंपरी, पुणे, पूर्णा, रोटेगाव, सांगली, सफाळे, सातारा, सेलू, शेगाव, शिवाजीनगर, सायन, सोलापूर, तळेगाव, ठाणे, तुमसर रोड, वाशिम.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नॅशनल डिझाइन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केंद्रांची एक-समान रचना करण्यात आली आहे. हस्तकला/कलाकुसरीच्या वस्तू, कापड आणि हातमाग वस्त्रे, पारंपरिक वस्त्रे, स्थानिक कृषी उत्पादन (भरड धान्यांसह) आणि प्रक्रिया केलेले-अर्ध प्रक्रिया केलेले अन्न हे विक्री केंद्रात उपलब्ध असेल.

‘एक स्थानक एक उत्पादन’ हे संबंधित ठिकाणची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करत असून त्यामध्ये त्या प्रदेशातील आदिवासी जमातींनी बनवलेल्या कलाकृती, स्थानिक विणकरांनी बनवलेली हातमाग वस्त्रे, लाकडावरील कोरीवकाम, चिकनकारी आणि जरी-जरदोजी यासारखे कपड्यावरील कलाकुसरीचे काम अथवा त्या प्रदेशात उत्पादन केलेले मसाले चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले-अर्ध प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ-उत्पादने यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT