air quality nashik 
नाशिक

हवेची गुणवत्ता टिकविण्यासाठी केंद्राचा कृती आराखडा; महापालिकेला २० कोटींचा निधी

विक्रांत मते

नाशिक : वाढत्या शहरांमधील हवेची गुणवत्ता नियंत्रणात ठेवण्याबरोबरच भविष्यात गुणवत्ता कायमस्वरूपी टिकविण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला देऊ केलेला वीस कोटींचा निधी खर्चासाठी कृती आराखडा ठरवून दिला आहे. त्यानुसार महापालिकेला शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरील वाहतूक बेटांवर प्रदूषण मापक यंत्रे बसविण्याबरोबरच इंधन भेसळ तपासण्याचे निर्देश दिले आहेत. 

निधी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाचा नुकताच अहवाल सादर केला. त्यात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्या शहरांनी प्रयत्न केले, त्या शहरांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधी देऊ केला आहे. महाराष्ट्रातील सहा मोठ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश करताना वीस कोटी पाच लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. निधीचा विनियोग हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच करायचा असून, त्यासाठी महापालिकेला कृती आराखडा दिला आहे. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक बेटांवर प्रदूषण मापक यंत्रे बसविण्याबरोबरच इंधनामधील भेसळ तपासण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृती आराखड्याची अंमलबजावणी करताना शासनाच्या संबंधित विभागांकडे निधी वर्ग करावा लागणार आहे. महापालिकेबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालय, महाजनको, अन्न व औषधे प्रशासन, वाहतूक पोलिस, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आदी शासकीय कार्यालयांच्या अधिकार क्षेत्रानुसार कृती आराखडा अमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवेतील सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड कमी करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. 

उपाययोजना अशा 

- प्रदूषणकारी वाहनांवर कडक कारवाई 
- नवीन बांधकामांवर ग्रीन नेट लावणे 
- ढाब्यांवर एलपीजी गॅस वापरणे बंधनकारक 
- औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेवर नियंत्रण 
- नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई 
- जुन्या डिझेल वाहनांवर बंदी 
- नवीन डिझेल वाहनांना परवाना देणे 
- इंधनातील भेसळ रोखणे 
- धुळीच्या रस्त्यांचे नव्या रस्त्यात रूपांतर 
- रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे 
- अवजड वाहनांची वाहतूक बाह्य मार्गाने वळविणे 
- इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविणे- अवजड वाहनांमधील माल तपासण्यासाठी ठराविक ठिकाणी वजनकाटा 
- एकीकृत सिग्नल यंत्रणा उभारणे 
- सेन्सर यंत्राद्वारे सल्फर डाय ऑक्साइड तपासणे 
- दुभाजकांमध्ये झाडे लावणे, कारंजे उभारणे 

शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यात महापालिका यशस्वी ठरली असून, भविष्यातही गुणवत्ता टिकविण्यासाठी सरकारने दिलेल्या कृती आराखड्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल. 
- नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT